Trending News : हेच उरलेलं आता! 'या' अभिनेत्याच्या Underwear चा होणार लिलाव

Trending News  : हेच बाकी होतं आहेत आता...तुम्ही कसला कसला लिलाव पाहिला आहे. घर, वस्तू अगदी एखाद्या जुन्हा आणि ऐतिहासिक वस्तूचं लिलाव...नुकतच मुंबईत WPL Auction 2023 झालं. ज्यात महिला क्रिकेटर्सची बोली लागली. पण तुम्ही कधी Underwear चा लिलाव ऐकला आहे का?

Updated: Feb 16, 2023, 02:26 PM IST
Trending News :  हेच उरलेलं आता!  'या' अभिनेत्याच्या Underwear चा होणार लिलाव title=
Trending News breaking bad walter white actors Bryan Cranston underwear auction news in marathi

Trending News Bryan Cranston :  या जगात काही घडू शकतं असं वाटायला लागलं आहे. इथे कधी लोक काय करतील काही सांगता येतं नाही. आजपर्यंत आपण अनेक गोष्टींचा लिलाव पाहिला आहे. अगदी नुकतच मुंबईत WPL Auction 2023 झालं. ज्यात महिला किक्रेटर्सचा लिलाव झाला. पण तुम्ही कधी अंडरविअरचा लिलाव झाल्याचं ऐकलं आहे का? नाही ना. पण आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या अंडरविअरचा लिलाव होणार आहे. कोण आहे हा अभिनेता आणि त्याचा का अशी वेळ आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर मग जाणून घेऊयात या लिलावाबद्दल 

कोण आहे हा अभिनेता?

जगभरात असे काही लोक आहेत जे त्यांच्या आवडत्या क्रीडा व्यक्तीशी संबंधित गोष्टी राजकारणी आणि चित्रपट व्यक्तिमत्त्वांपर्यंत गोळा करतात. यापूर्वी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने वापरलेल्या टिश्यू पेपरपासून ते अनेक स्टार्सच्या वस्तू लिलावात चढ्या किमतीत विकल्या गेल्या आहेत. 

सध्या ब्रेकिंग बॅड या हिट मालिकेतील अभिनेता ब्रायन क्रॅन्स्टनच्या अंडरवेअरचा लिलाव होणार आहे. त्याच्या एका अंडरवियरच्या लिलावादरम्यान त्याची किंमत US $ 5,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतीय रुपयांमध्ये जे 4 लाखांपेक्षा जास्त आहे. ब्रेकिंग बॅड मालिकेत अभिनेता ब्रायन क्रॅन्स्टनने केमिस्ट्री शिक्षकाची भूमिका केली होती जो नंतर ड्रग माफिया वॉल्टर व्हाईट बनला होता. (Trending News breaking bad walter white actors Bryan Cranston underwear auction news in marathi)

4 लाखांची अंडरवियर

ब्रायन क्रॅन्स्टनने या सिरीजमध्ये घातलेल्याच अंडरेवअरचं लिलाव होणार आहे.  मालिकेच्या पहिल्या भागात त्याच्या वॉर्डरोबमध्ये अंडरवेअरची जोडी दिसली होती. या जोडीला लिलावात भारतीय रुपयाच 2 ते 4 लाखांपर्यंत किंमत येईल, असा अंदाज लिलावाच्या आयोजक प्रॉपस्टोर यांनी व्यक्त केला आहे. 

breaking_bad_underwear

कधी आहे लिलाव?

आम्ही तुम्हाला सांगतो की, लिलावामध्ये समाविष्ट असलेल्या इतर कपड्यांमध्ये अभिनेत्री पामेला अँडरसन आणि गायिका केली ऑस्बॉर्न यांनी अमेरिकन टीव्ही शो डान्सिंग विथ द स्टार्समध्ये त्यांच्या परफॉर्मन्सदरम्यान परिधान केलेले कपडे समाविष्ट आहेत. या लोकप्रिय डान्स शोच्या सीझन 10 मध्ये अभिनेत्री पामेला अँडरसनच्या स्विंग ड्रेसची किंमत US$2,000 ते US$4,000 च्या दरम्यान आहे. ऑनलाइन लिलाव सध्या बोलीसाठी खुला आहे आणि मंगळवार, 28 फेब्रुवारी रोजी संपेल.