Shraddha Kapoor : श्रद्धा- रणबीरच्या नवीन गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ, नेटकरी म्हणतात Show Me The Thumka; पाहा VIDEO

Show Me The Thumka Video : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटातील तिसरं गाण रिलीज झालं. या पिवळ्या साडीत श्रद्धाने जे ठुमके मारले आहेत, ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. तुम्ही पाहिले का?

Updated: Feb 22, 2023, 09:34 AM IST
Shraddha Kapoor : श्रद्धा- रणबीरच्या नवीन गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ, नेटकरी म्हणतात Show Me The Thumka; पाहा VIDEO title=
tu jhoothi main makkaar song show me the thumka ranbir kapoor shraddha kapoor dance video viral on Social media trending now

Tu Jhoothi Main Makkaar Video :  दिग्दर्शक लव्ह रंजनचा (Love Ranjan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'तू झुठी मैं मक्कार'  (Tu Jhoothi Main Makkaar)  दिवसेंदिवस क्रेझ वाढतं जातं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Tu Jhoothi Main Makkaar Trailer)  रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच उत्सुकता आहे. रोमान्स (Romance video), भांडण आणि ड्रामाने भरलेला या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पहिल्यांदाच ऑन स्क्रीन दिसणार आहे. या चित्रपटात या दोघांमध्ये भरपूर किसिंग सीन आहेत.  3 मिनिटं 25 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये या दोघांनी किसिंग (Kissing video) करत भरपूर रोमान्स केला आहे. त्यानंतर या चित्रपटाचं तिसरं गाणं रिलीज झालं आहे. त्यानंतर श्रद्धा कपूरने इंटरनेटवर धुमाकूळ (viral) घातला आहे. नेटकरी श्रद्धाला Show Me The Thumka असं म्हणतं आहेत.

शो मी द ठुमका!

रणबीर (#RanbirKapoor) आणि श्रद्धाने देशी लूक आणि डान्स मूव्हने एक खळबळ माजवली आहे. सध्या इंटरनेटवर (Social media) यांचं हे गाणं ट्रेंडिंगमध्ये (trending video) आहे. यंदाचा होळीलादेखील हे गाणं आवजणार यात शंका नाही.  श्रद्धा कपूर पिवळ्या साडीत तिचा बोल्ड लूक (Shraddha Kapoor Bold) लव रंजनच्या नवीन ट्रॅक 'तू झुठी मैं मक्का'ला ठुमका पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. (tu jhoothi main makkaar song show me the thumka ranbir kapoor shraddha kapoor Bold hot dance video viral on Social media trending now)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यापूर्वी  'तेरे प्यार में' आणि 'प्यार होता कै बार है ही गाणी रीलिज झाली होती. पण त्यापेक्षा या गाण्यातील पतली कंबर आणि पिवळ्या साडीतील श्रद्धा ठुमका नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. सुनिधी चौहान आणि शाश्वत सिंग यांनी गायलेले आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले, 'शो मी द ठुमका' हे गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर शेवटचा अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसला होता, जो 2022 मधील सर्वात हिट ठरला. सध्या ट्वीटरवर रणबीरने शाहरुख खानच्या (#ShahRukhKhan) गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

दुसरीकडे, श्रद्धा वरुण धवनच्या 'भेडिया'मध्ये स्पेशल अपिअरन्समध्ये दिसली होती.