दिवाळीनिमित्त घरी आलेल्या राणासाठी आई भावूक

कुटुंबियांनी शेअर केल्या राणादाच्या आठवणी 

Updated: Oct 29, 2019, 04:07 PM IST
दिवाळीनिमित्त घरी आलेल्या राणासाठी आई भावूक

मुंबई : दिवाळी हा सण उत्साहाचा आणि चैतन्याचा आहे. या सणाला प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. मग याला आपले कलाकार कसे अपवाद असतील? दिवाळीच्यानिमित्ताने असाच राणा दा म्हणजे हार्दिक जोशी  आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करण्यासाठी कोल्हापूरहून ठाण्याला आपल्या घरी आला आहे. 

झी चोवीस तास डॉट कॉमने या निमित्ताने त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत. हा व्हिडिओ Zee24Taas.com च्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये राणा म्हणजे हार्दिक जोशीसोबत त्याचा संपूर्ण परिवार आहे. त्याच्या बहिणी, आई-वडिल, मामा-मामी असा संपूर्ण कुटूंब येथे उपस्थित आहे. 

यावेळी त्याच्या लहान बहिणीने बालपणीचा मस्तीखोर हार्दिक कसा होता? हे सांगितलं आहे. तसेच त्याचे लहानपणीचे अनेक किस्से देखील या एफबी लाईव्हमध्ये शेअर केले आहेत. तसेच हार्दिकच्या आईने यावेळी हार्दिक आणि राणा यांच्यात किती साम्य आहे ते सांगितलं. हार्दिक देखील राणासारखा समजुतदार आणि हळवा असल्याचं देखील त्या म्हणाल्या. 

राणादा म्हणजे हार्दिकसोबतचं हे फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहा. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या 'तुझ्यात जीव रंगला'मालिकेनं वेगळं वळण घेतलं आहे. राणा आणि अंजली यांना लक्ष्मी ही गोंडस मुलगी झाली आहे. राणाने आपलं शिक्षण पूर्ण करून तो पोलिसात भरती झाला आहे.