'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलेय.

Updated: May 26, 2017, 09:59 PM IST
'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलेय.

राणादा-अंजलीबाईंच्या या मालिकेने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला मागे टाकत पहिले स्थान मिळवलेय. दुसऱ्या स्थानावर 'माझ्या नवऱ्याची बायको', तिसऱ्या स्थानी 'काहे दिया परदेस' आहे.

नव्याने सुरु झालेली 'लागिरं झालं जी' ही मालिका टीआरपीमध्ये चौथ्या स्थानी आहे तर 'खुलता कळी खुलेना' ही पाचव्या स्थानी आहे.