मुंबई : एका ४२ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने तिच्या माजी प्रियकराला बेदम मारहान केली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या घरी माजी प्रियकराला जीवे मारले आहे. ही धक्कादायक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. याप्रकरणी अभिनेत्री एस. देवीने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
या हत्ये प्रकरणी तिचा पती बी. शंकरला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय अभिनेत्री बहिण एस. लक्ष्मी आणि पती सवरियारला सुद्धा ताब्यात घेतले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तनुसार, एस देवीचा माजी प्रियकर पुन्हा नात्याची मागणी करत होता.
परंतु, देवीला हे नातं मान्य नसल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. देवीच्या माजी प्रियकराचे नाव एम रवी असं होतं. तो चित्रपटसृष्टीत टेक्नीशनचं काम करत होता.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, ८ वर्षांपूर्वी मदुरई या ठिकाणी त्यांची मैत्री झाली. कलांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. देवी मालिकांमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम करत होती. तर २ वर्षांपूर्वी देवीच्या पतीला तिच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळाले.
तेव्हा तिच्या पतीने आणि कुटुंबाने देवीला तिच्या प्रियकरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रवीने देवीचा शोध घेतला आणि नात्याची मागणी केली. तेव्हा रागाच्या भरात तिने रवीला जीवे मारले आणि अखेर पोलिसांत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.