प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न

Sruthi Shanmuga Priya : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती षणमुग प्रिया हिच्या पतीचे अकाली निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने श्रुतीचा पतीचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 4, 2023, 03:23 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न title=
(फोटो सौजन्य श्रुती षणमुग प्रिया/ Instagram)

Shocking News : दाक्षिणात्य सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रुती षणमुग प्रिया (Sruthi Shanmuga Priya) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रुतीचे पती अरविंद शेखर (Arvind Shekar) यांचे आकस्मिक निधन झाले आहे. अरविंद यांचा हृदयविकाराचा झटक्यामुळे मृत्यू असल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद यांचे 2 ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. अरविंद शेखर यांनी वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अरविंद शेखर हे बॉडीबिल्डर होते. श्रुती आणि अरविंद शेखर यांचा गेल्यावर्षी मे महिन्यातच लग्न झाले होते. मात्र आता वर्षभरानंतरच त्यांची साथ सुटली आहे.

अरविंद शेखर हे व्यवसायाने फिटनेस कोच तर पेशाने इंजिनिअर होते मात्र वयाच्या 30 व्या वर्षीच अरविंद शेखर यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अरविंद शेखर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना अरविंद यांना वाचवता आले नाही. गेल्या वर्षी झालेल्या मिस्टर तमिळनाडू या स्पर्धेचा किताब देखील अरविंद शेखर यांनीच जिंकला होता. त्यानंतर मे महिन्यात अरविंद शेखर यांनी अभिनेत्री श्रुती षणमुग प्रियासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मे 2023 मध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला होता.

पतीच्या अकाली निधनानंतर श्रुती षणमुग प्रियाला दुःख अनावर झालं आहे. पतीच्या निधनानंतर श्रुतीने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अरविंद शेखरसोबतचा आनंदी आणि रोमँटिक फोटो शेअर करत श्रुतीने कॅप्शन लिहिलं आहे. "फक्त शरीर हे जग सोडून गेले आहे. पण तुझा आत्मा आणि मन माझ्यासोबत आहे आणि त्याने आजही मला सुरक्षित ठेवले आहे आणि नेहमीच राहील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो प्रिय अरविंद शेखर," असे श्रुतीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"माझे तुझ्यावरचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त आठवणी आहेत. मी त्यांना आयुष्यभर जपणार आहे. मला तुझी आठवण येत आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे अरविंद. तू माझ्यासोबत आहेस असे मला वाटते. #loveyouhusband," असेही श्रुतीनं म्हटलं आहे.

श्रुती आणि अरविंद शेखर यांच्या भव्यदिव्य लग्नात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. श्रुती तिच्या पतीच्या कुटुंबासह अनेक पाहुणे देखील दोघांच्या लग्नासाठी पोहोचले होते. मात्र आता अरविंदच्या मृत्यूनंतर श्रुतीचे आयुष्यच उजाड झाले आहे. पण या कठीण काळातही तिने धीर सोडला नाही. इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी आणि श्रुतीचे चाहते तिच्या समर्थनात उभे आहेत आणि तिच्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.