ट्विंकल खन्ना ही गोष्ट अक्षयशी कधीच शेअर करत नाही...
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने देखील त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन वेगळ्याच अंदाजात केलंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रात तिने 'रोमांस टॉयलेट में क्यों रुक जाना चाहिए' या नावाचा लेख लिहिलाय.
Toilet-Ek Loo Story https://t.co/S6TiWt27WZ? #satire #acronymfever pic.twitter.com/7DmwBAa8gv
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) July 30, 2017
हा लेख तिने ट्विटरवरुनही शेअर केलाय. याच ट्विटला अक्षयनेही रिट्वीट केलेय. रिट्वीट करताना अक्षय म्हणालाय की, मला वाटले की ट्विंकल माझ्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटाचे प्रमोशन करतेय मात्र...
Here I thought she was promoting my film Toilet - Ek Prem Katha but... https://t.co/29k2NfJCeg
— Akshay Kumar (@akshaykumar) July 30, 2017
या लेखात ट्विंकलने आपल्या वैवाहिक जीवनातील एक किस्साही शेअर केलाय. लग्नाआधी ट्विंकलने अक्षयसमोर एक अट घातली होती. मी तुझ्याशी सर्वकाही शेअर करेन. मी माझ हृदय, शरीर, लाइफ सगळं शेअर करेन एवढंच नाही तर माझं जेवणही शेअर करेल. पण मी कधीच माझं टॉयलेट शेअर करणार नाही, अशी अट ट्विंकलने अक्षयसमोर घातली होती.
येत्या ११ ऑगस्टला अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अक्षयसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच देवेंद्र शर्मा, सुधीर पांडे, शोभा खोटे, अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत.