मुंबई : झी मराठी वाहिनी ही मराठी प्रेक्षकांच्या मनातील लोकप्रिय वाहिनी. नवनव्या मालिकांसोबत झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच मनोरंजन करत असते.वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. झी मराठी आता प्रेक्षकांच्या भेटीला दोन नव्या मालिका घेऊन येत आहे.
आता दोन मालिका या वेगळ्या विषयावर आधरित आहे. 'काय घडलं त्या रात्री' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत एका अभिनेत्याच्या आत्महत्येचे वृत्त दाखवण्यात आले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. ही मालिका ३१ डिसेंबरपासून गुरूवार ते शनिवारपर्यंत रात्री ९.३० वाजता प्रदर्शित होणार आहे.
तसेच आणखी एक मालिका झी मराठीवर भेटीला येत आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका ४ जानेवारीपासून सोमवार ते शनिवारपर्यंत रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत सासू-सुनेचं हलकं फुलकं नातं दाखवण्यात येत आहे. या मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले सासूच्या भूमिकेत आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका ४ जानेवारीपासून सायंकाळी ६.३० वाजता दाखवता येणार आहे. (शनायावरून 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवा ट्विस्ट) या मालिकेच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.