मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक वाजिद खान (Wajid Khan) यांच्या पत्नीने कमलरुख (Kamalrukh) ने एका मुलाखतीत खूप धक्कादायक आरोप केले आहेत. या मुलाखतीत कमलरुखने वाजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. कमलरुखीने वर्षे वाजिद खानला डेट केलं आहे. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याबद्दल सांगताना कमलरूखीने खूप गंभीर आरोप केले आहेत. वाजिद खान यांच्या निधनानंतर केलेल्या या आरोपामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. १ जून २०२० रोजी वाजिद खानचं निधन झालं.
वाजिद खानच्या पत्नीने केलेले आरोप हे २०१४ चे आहेत. यामुळे कमलरूख आणि वाजिद खान गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहत होते. कमलरुखने सांगितलं की, २०१४ साली वाजिदने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर वाजिदने कमलरुखची माफी मागितली होती.
कमलरुखने पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्यामुळे वाजिद आणि माझ्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. धर्म परिवर्तन करण्याच्या गोष्टीने आमच्या नात्यात टॉक्सिकचं काम करत होतं.
कमलरूखला भेदभावचा सामना करावा लागला कमलरुखने म्हटलं की,'मी पारसी होती आणि वाजिद मुस्लिम होते. आम्ही कॉलेजमधील स्वीटहार्ट्स होतो. आम्ही स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न केलं. याबाबत मला लिहायचं आहे.' वाजिद खान यांच यावर्षी १ जून निधन झालं. ३१ मे २०२० त्यांची तब्बेत बिघडली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.