मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा दबदबा सुरू आहे. एक काळ असा होता की सिनेविश्वातील हिरोईन निवडण्याची लगामही अंडरवर्ल्डच्या हातात होती. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची नावं अंडरवर्ल्डशी अशा प्रकारे जोडली गेली आहेत की, त्यांचं संपूर्ण करियर उद्ध्वस्त झालं. बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या या वर्चस्वावर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मौन सोडलं आहे.
प्रेशरमुळे अनेकदा मिळाल्या नाहीत भूमिका
'द रणवीर सिंग पॉडकास्ट'शी बोलताना सोनाली बेंद्रेने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल अनेक गुपितं उघड केली. ९० च्या दशकाविषयी बोलताना सोनाली ब्रेंद्रे म्हणाली, 'एक काळ असाही होता की मला एक भूमिका मिळाली होती पण कोणीतरी तरी त्यांना कॉल केला आणि तिच भूमिका दुसरीकडे गेली.
मात्र दिग्दर्शक किंवा सहकलाकार तुम्हाला कॉल करतील आणि 'माझ्यावर दबाव आहे आणि मी याबद्दल काहीही करू शकत नाही' असं म्हणेल. मला हे सगळं समजत होतं.
सिनेमात लागायचा अंडरवर्ल्डचा पैसा
त्या काळाबद्दल बोलताना सोनाली बेंद्रे पुढे म्हणाली की, 'असे अनेक स्त्रोत होते ज्यातून हे लोकं फायनान्स करायचे. पण काहीच प्रॉपर नव्हतं.