ZEE-5 च्या हॉरर्र वेब फिल्ममध्ये झळकणार मिस इंडिया अदिती आर्य

झी ५ ओरिजिनल्सचा नवीन होरर्र वेब सिनेमा "अनलॉक - द हाँटेड अॅप" 

शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2020, 04:31 PM IST
ZEE-5 च्या हॉरर्र वेब फिल्ममध्ये झळकणार मिस इंडिया अदिती आर्य

मुंबई : मिस इंडिया आणि अभिनेत्री अदिती आर्या आता झी ५ ओरिजिनल्सच्या नवीन होरर्र वेब सिनेमा "अनलॉक - द हाँटेड अॅप" मध्ये झळकणार आहे. १३ मार्च रोजी हा वेब सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब फिल्ममध्ये अदिती आपणास रिद्धी नावाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अदिती आर्या सोबतच हिना खान, कुशाल टंडन आणि रिषभ सिंह या कलाकारांनी देखील यामध्ये काम केलं आहे. या वेब सिनेमाचं दिग्दर्शन देवात्म मंडळ यांनी केले आहे. 

हाँटेड ऍप बद्दल सांगताना अदिती आर्यने म्हटलं की, "मी रिद्धीची भूमिका साकारत आहे आणि या वेब फिल्म मध्ये प्रेक्षकांना होरर्र सोबत माझी, हिना खान आणि कुशाल टंडन मधलं लव्ह ट्रॅन्गल ही पाहता येणार आहे. मी या वेब फिल्मसाठी खूप उत्सुक आहे. कारण माझासाठी हे एक वेगळेच जॉनर आहे आणि मला ठाऊक आहे की होरर्र आवडीने पाहणाऱ्या प्रेक्षकांना "अनलॉक - द हाँटेड अॅप" देखील आवडेल.

Image result for aditi arya BOLLYWOOD LIFE

"अनलॉक - द हाँटेड अॅप"च्या व्यतिरिक्त अदितीने ओटीटी वेब शोमध्ये ही काम केले आहे. अदितीने तसे साऊथचे ब्लॉकबस्टर सिनेमे ही केले आहेत. येणाऱ्या काळात ती आणखी सिनेमांमध्ये झळकणार आहे.