उर्फीने मद्यधुंद अवस्थेत मिनी पिंक ड्रेसमध्ये फोटोग्राफर्ससमोर काय केलं पाहिलं का? Video झाला Viral

Uorfi Javed Viral Video: हा व्हिडीओ मुंबईमधील एका रेस्तराँबाहेरचा असून सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी मिनी पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 7, 2024, 08:43 PM IST
उर्फीने मद्यधुंद अवस्थेत मिनी पिंक ड्रेसमध्ये फोटोग्राफर्ससमोर काय केलं पाहिलं का? Video झाला Viral title=
सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय

Uorfi Javed Viral Video: अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांमुळे वरचेवर चर्चेत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शनिवारी रात्री म्हणजेच 6 जूनच्या रात्री उर्फी मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँबाहेर दिसून आली. पापाराझींच्या कॅमेराच्या नजरेतून उर्फी सुटली नाही. मात्र नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सबरोबर संवाद साधण्यास प्राधान्य देणाऱ्या उर्फीचा वेगळाच अंदाज यावेळेस पाहायला मिळाला. 

गर्दीतून वाट काढत कारपर्यंत पोहोचली

उर्फीने रेस्तराँमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जोरदार पार्टी केल्याचं तिच्या चालण्या-बोलण्यावरुन स्पष्ट होत होतं. खरं तर उर्फीला धड चालताही येत नव्हतं. उर्फीने मद्यपान केल्याचं तिच्या चालण्यावरुनच समजत होतं. वेडीवाकडी पावलं टाकत उर्फी पापाराझींच्या गर्दीतून वाट काढत आपल्या कारपर्यंत पोहोचली. 

अनेकदा पडता पडता वाचली

शुद्ध हरलवलेल्या अवस्थेतील उर्फीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये उर्फी तिच्या मैत्रिणींबरोबर अडखळत आणि चाचपडतच रेस्तराँबाहेर पडताना दिसत आहे. उर्फीने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला असून हाय हिल्स घातल्या आहेत. उर्फीला सरळ चालताही येत नसल्याचं व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे. उर्फी रेस्तराँच्या दरवाजापासून गाडीपर्यंत चालत जातना संभाव्यपणे मद्यधुंद अवस्थेत अनेकदा धडपडून पडता पडता वाचली. 

मद्यपान केल्याचा स्वत: केला खुलासा

उर्फीची अवस्था पाहून तिला तिच्या मैत्रिणी आधार देत कारपर्यंत घेऊन जात असल्याचं दिसून आलं. एकीकडे तिच्या मैत्रिणी तिला आधार देत असतानाच दुसरीकडे अर्धवट शुद्धीत असल्याप्रमाणे उर्फी फोटोग्राफर्सकडे पाहून हसत असल्याचं दिसून आलं. ती स्वत:शीच काहीतरी पुटपुटत होती. मध्येच तिने, "माझी कार कुठे आहे? मी मद्यपान केलं आहे," असं म्हणत मद्यपान केल्याचं मान्य केलं. 

कारमध्ये बसल्यानंतर दिली फुलं

कारमध्ये बसल्यानंतर उर्फीने तिच्या कारमधील काही फुलं पापाराझींना काढून दिली. ती फोटोग्राफर्सकडे पाहून विचित्रपणे हसत होती. अखेरच तिच्या मैत्रिणींनी ड्रायव्हरला इथून निघ असं सांगितल्यानंतर उर्फीची कार तिचा घेऊन तिथून निघाली.

मागच्या शनिवारीही अशीच झालेली स्पॉट

मागील शनिवारीही उर्फी अशाचप्रकारे मुंबईमधील एका पबबाहेर मद्यधुंदावस्थेत दिसून आली होती. त्यावेळेही तिने स्वत: "बहुत पी रखी है" असं म्हणत आपण मद्यपान केल्याचं सांगितलं होतं.

नुकतेच केले पदार्पण

उर्फी ही तिच्या अभिनयापेक्षा कपड्यांमुळे आणि सोशल मीडियामुळे चर्चेत असते. उर्फीने नुकतेच एकता कपूरच्या 'लव्ह सेक्स और धोका 2' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. लवकरच उर्फी एका रिअॅलिटी शोमध्येही दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.