मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पुलावर भगदाड; कर्मचाऱ्याने खाली उभं राहून केले वाहनचालकांना सावध

 मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पुलावर भगदाड पडले आहे. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 29, 2024, 07:54 PM IST
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पुलावर भगदाड; कर्मचाऱ्याने खाली उभं राहून केले वाहनचालकांना सावध title=

Mumbai-ahmedabad Highway : मुंबई-नगर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे गुजरातहुन मुंबईकडे जाणा-या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  सुसरी नदीवरील पुलाला हे भगदाड पडले आहे. हे भगदाड इतके मोठे आहे की वाहन कर्मचाऱ्याने पुलाच्या खाली उभ राहून  वाहनचालकांना सावध केले आहे. या प्रकारामुळे वाहने धीम्या गतीने जात आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. 

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. डहाणूतील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पूलाला भगदाड पडलंय. त्यामुळे गुजरात हुन मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर ट्राफिक जाम आहे. तीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत . महामार्गावर असलेल्या मुख्य पुलालाच भगदाड पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे . दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या पूलाच्या दुरुस्तीची होत होती मागणी मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

येवला तालुक्यातील आडगाव अंदरसुल या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झालीये.. त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागतेय.. गेल्या 15 ते 20 वर्षापासून रस्त्याची अशीच दयनीय अवस्था आहे. प्रशासनाने त्वरित हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीये..