Urfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!

उर्फी जावेद (Urfi Javed) मुलगी नसून एक तृतीयपंथी (Urfi Javed is a transgender) आहे, असं फैजान अन्सारी (Faizan Ansari) म्हणाला आहे. उर्फीने स्वत: तृतीयपंथी (Transgender) असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय.

Updated: Mar 28, 2023, 09:17 PM IST
Urfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!
Urfi Javed is a transgender

Faizan Ansari On Urfi Javed: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता उर्फी अनोख्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद हे नाव तिच्या कपड्यांवरून ओळखलं जातं. तिच्या अतरंगी कपड्यामुळे (Urfi Javed New Dress) अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागलाय. अशातच आता तिच्यावर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. अभिनेता फैजान अन्सारी (Actor Faizan Ansari) याने धक्कादायक विधान केल्याने वादाला तोंड फुटलं आहे.

काय म्हणाला Faizan Ansari?

उर्फी जावेद (Urfi Javed) मुलगी नसून एक तृतीयपंथी (Urfi Javed is a transgender) आहे, असं फैजान अन्सारी (Faizan Ansari) म्हणाला आहे. उर्फी ज्या पद्धतीने बोलते. जसे कपडे घालते, यावरुन हे सिद्ध होतंय की, ती तृतीयपंथी आहे. उर्फी तृतीयपंथी असल्याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचं तुमच्या लक्षात येईल, असं धक्कादायक वक्तव्य फैजान अन्सारीने केलंय.

उर्फीने स्वत: तृतीयपंथी (Transgender) असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय. असं केलं नाही तर तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अन्सारीने सांगितलंय. ईटाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यामुळे यावर आता उर्फी काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आणखी वाचा - Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, फैजान अन्सारी नेहमी उर्फीच्या कपड्यांवरून तिच्यावर निशाणा साधताना दिसतोय. उर्फी मुंबईचं वातावरण दुषित करत असल्याचं फैजानने म्हटलं होतं. त्याचबरोबर त्याने उर्फीविरोधात तक्रार देखील दाखल केली होती. उर्फीमुळे समाजाच्या नजरा बदलत आहेत. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात असल्याचं त्याने म्हणून दाखवलं होतं.