सामंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने नव्या आयुष्याला केली सुरुवात

लवकरच नागाचा कस्टडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा पुलिस ड्रामावर आधारित आहे. वेंकट प्रभू दिग्दर्शित या सिनेमाचं शूटींग नूकतंच सुरु झालं आहे.

Updated: Mar 28, 2023, 09:13 PM IST
सामंथासोबत  घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने नव्या आयुष्याला केली सुरुवात

मुंबई :  दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा काही दिवसांपूर्वी त्याच्या लंडन ट्रीपमुळे चर्चेत आला होता. दरम्यान, आता नागा चैतन्य एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. चर्चा अशी सुरु आहे की नागा चैतन्यनं घटस्फोटानंतर आता त्याचं घर घेतलं आहे. नागा चैतन्यनं हैदराबादमध्ये पॉश कॉलोनी जुबली हिल्समध्ये एक आलिशान घर घेतलं आहे. नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटाला तीन वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता नागा चैतन्यनं घर घेतलं आहे. दरम्यान, नागा चैतन्यनं बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

नागा चैतन्यच्या या नवीन घराची किंमत 15 कोटींची असल्याचे म्हटले आहे. समांथा आणि नागा चैतन्यचा 2021 साली घटस्फोट झाला होता. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार नागा चैतन्य इतके दिवस हॉटेलमध्ये राहत होता. तर समांथा इतके दिवस तिच्या हैदराबादच्या घरात राहत होती. इतक्या वर्षांनंतर नागा चैतन्य आता त्याच्या स्वत: च्या नव्या घरात राहायला गेला आहे. त्याने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

 मात्र अभिनेत्याने याबाबत कुठेच आणि काहीचं सांगतलेलं नाहीये. नुकताच अभिनेता वडिलांसोबत अभिनेता राम चरणच्या बर्थडे पार्टीत पोहचला होता. यावेळी त्याच्यासोबत भाऊ अखिल अक्किनेनी देखील होता. 

लवकरच नागाचा कस्टडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा पुलिस ड्रामावर आधारित आहे. वेंकट प्रभू दिग्दर्शित या सिनेमाचं शूटींग नूकतंच सुरु झालं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत क्रिती शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आणि चित्रपट 12 मे 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.

अरविंद स्वामी खलनायकाच्या भूमिकेत आहेत. तर प्रियामणीदेखील या सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात  संपत राज, सरथकुमार, प्रेमजी, वेनेला किशोर, प्रेमी विश्वनाथ आदी कलाकार आहेत. 

गेल्यावर्षी सामंथा आणि नागाने घटस्फोट घेत त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. सगळं काही सुरळीत सुरु असताना एकाकेकी या जोडप्याने वेगळं होण्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप या जोडीने हा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरणं दिलं नाही.  आता हे दोन्ही कलाकार आप-आपल्या आयुष्या पुढे गेले आहेत.