उर्मिला कोठारेने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो

उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेसृष्टींतील हॉट कपल्सपैकी एक आहे.

Updated: Mar 7, 2018, 03:03 PM IST
उर्मिला कोठारेने शेअर केला तिच्या मुलीचा पहिला फोटो  title=
facebook

मुंबई: उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेसृष्टींतील हॉट कपल्सपैकी एक आहे.

जानेवारी महिन्यात उर्मिला आणि आदिनाथ या जोडीच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचे आगमन झाले.  

उर्मिलाने शेअर केला खास फोटो  

गरोदरपणातही अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या उर्मिलाने पहिल्यांदा चाहत्यांसोबत तिच्या मुलीची पहिली झलक शेअर केली आहे. उर्मिलाची मुलगी अवघ्या दोन महिन्यांची आहे. 

 

आई होण्याचं सुख कसं असतं? हे उर्मिलाने फोटोसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहलेले आहे. 

गरोदरपणातही उर्मिला होती अ‍ॅक्टीव्ह 

दरोदरपणाच्या काळात स्त्रीने काळजी घेणं आवश्यक असते. योगसाधना आणि व्यायामप्रकारांनी काही त्रास आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते. मात्र याबाबत  अजूनही स्त्रियांमध्ये पुरेशी सजकता नाही.  

गरोदरपणातील आणि त्यानंतरच्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी उर्मिलाने काही व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. सोबतच गरोदरपणातील खास फोटोशूट, बेबी शॉव्हर  कार्यक्रमाचे फोटोदेखील वेळोवेळी उर्मिलाने शेअर केले आहेत.