उर्मिला मातोंडकरसोबत 'छम्मा छम्मा'च्या शुटींग वेळी काय घडलं होतं? की झाली रक्तबंबाळ

जेव्हा शूट संपले तेव्हा मला शरीरावर खूप जखमा झाल्याचं दिसलं. मला ते दिवस अजूनही आठवतात. 

Updated: Mar 1, 2022, 07:36 PM IST
  उर्मिला मातोंडकरसोबत 'छम्मा छम्मा'च्या शुटींग वेळी काय घडलं होतं? की झाली रक्तबंबाळ title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भलेही आता सिनेजगतापासून दुरावली असेल, पण एक काळ असा होता जेव्हा सगळ्यांना या अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाच्या प्रेमात पाडलं होते.

लोक तिला रंगीला गर्ल आणि छम्मा छम्मा गर्ल म्हणून ओळखतात. मात्र, इंडस्ट्रीत आपली जागा मिळवण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

उर्मिला मातोंडकरने स्वतः एका शो दरम्यान सांगितले होते की, 'छम्मा छम्मा' गाण्यात बंजारनच्या लूकसाठी तिला 15 किलो वजनाचे भारी दागिने घालावे लागले होते आणि तिला रिहर्सल करायलाही वेळ मिळाला नव्हता. 

ती म्हणाली, 'गाण्याच्या पहिल्या शॉटच्या वेळी, मी घातलेल्या कानातल्यांमुळे मला खूप दुखापत झाली होती, जेव्हा शूट संपले तेव्हा मला शरीरावर खूप जखमा झाल्याचं दिसलं. मला ते दिवस अजूनही आठवतात. कारण मला सुमारे 15 किलोचे दागिने घालायचे होते.

उर्मिलाच्या म्हणण्यानुसार, राजकुमार संतोषी यांनी तिला विचारले होते की तिचे दागिने खूप भारी आहेत.

त्याला जाणून घ्यायचे होते की उर्मिलाला त्यात काही बदल करायचे आहेत का? केसांवरील काही दागिने कमी करायचे आहेत, कारण त्याला गाण्याच्या स्टेप्स बदलायच्या नव्हत्या. याला उत्तर देताना उर्मिलाने सांगितले की, 'मी हे दागिने सांभाळून घेईन, 

कारण या गाण्यात बंजारणचा लूक राखणेही आवश्यक होते. अशाप्रकारे एवढ्या वजनांच्या दागिण्यांमुळे दुखापत झालेली असताना ही उर्मिला यांनी हे गाणं पुर्ण केलं. आणि आज ती हिट गाणं मानलं जातं.