घटस्फोटानंतर मुलच देत आहेत अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला

टीव्ही अभिनेत्रीचं लग्न झालं तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती

Updated: Jun 3, 2022, 10:14 PM IST
घटस्फोटानंतर मुलच देत आहेत अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचं लग्न झालं तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती आणि जेव्हा ती 17 वर्षांची झाली तेव्हा तिने सागर आणि क्षितिज या जुळ्या मुलांना जन्म दिला. एवढ्या वर्षात तिने त्यांना आई म्हणून वाढवलं ​​पण तिने आता 'सेटल' व्हावं अशी तिच्या कुटुंबाची इच्छा आहे. मात्र, उर्वशी ढोलकिया ठामपणे सांगते की, अशा काही गोष्टी आहेत ज्यात ती जोडीदाराच्या बाबतीत तडजोड करणार नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र असणं सर्वात महत्त्वाचं आहे.

उर्वशी ढोलकिया पुढे म्हणाली, 'माझी मुलं आणि कुटुंबीयांना मी सेटल व्हावं अशी इच्छा आहे. मात्र मी अद्याप याबद्दल गंभीर विचार केलेला नाही. माझी मुलं अनेकदा मला कोणाशीतरी लग्न किंवा डेट करायला सांगतात पण जेव्हा जेव्हा मला या विषयांचा सामना करावा लागतो तेव्हा मी हसते. आणि सगळं हसण्यावर घालवते, पण आता मी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडले आहे.

उर्वशी तिच्या परीने जगते आयुष्य 
उर्वशी ढोलकिया पुढे म्हणाली, 'जे व्हायचं ते होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप स्वतंत्र स्त्री आहे आणि माझ्या अटींवर आयुष्य जगते. त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याचा ऱ्हास करण्यापेक्षा हे समजून घेणाऱ्या व्यक्तीची मला गरज आहे.'

मुलांना बोर्डिंगला पाठवणं उर्वशी रौतेलासाठी सगळ्यात कठिण आहे
 गेल्या वर्षी एका मुलाखतीदरम्यान, तिने सांगितलं होतं की आपल्या मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवताना तिला किती त्रास होतो. जेव्हा ते फक्त आठ वर्षांचा होते. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याला बोर्डिगला पाठवण्याच्या निर्णयाने मी कधीच खूश नव्हते. पण दुसरीकडे मला त्यांच्या भविष्यासाठी ते करावं लागलं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x