Actor did not had Chapati for 51 : अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी सेलिब्रिटींनी त्यांच्या आरोग्यावर खूप लक्ष द्यावं लागतं. आरोग्य आणि त्यासोबत फिटनेसकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळेच सगळेच सेलिब्रिटी हे नेहमीच काही ना काही करताना दिसतात किंवा सगळ्यात जास्त वेळ ते जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतात. इंडस्ट्रीमध्ये फिटनेस आणि फीट अशी बॉडी या दोन गोष्टींचा एकत्र उल्लेख केला जातो. त्यात बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांची नावं आहेत. पण यात दोन्ही सुपरस्टार्स हे खूप मेहनत घेताना दिसतात. आज आपण अशा एका सेलिब्रिटीविषयी जाणून घेणार आहोत. ज्याचं डायट शेड्युल खूप कठीण आहे आणि त्यासोबत ते फॉलो करणं खूप कठीण आहे. इतकंच नाही तर फिटनेसमध्ये ते इतर अनेक लोकप्रिय कलाकारांना मागे टाकतो. हा अभिनेता दुसरा कोणी नसून 51 वर्षांचा सोनू सूद आहे.
51 वर्षांच्या सोनू सूदविषयी बोलायचं झालं तर सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'फतेह' ला घेऊन चर्चेत आहेत. याच चित्रपटाचं तो प्रमोशन करत आहे. त्यानं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. फिटनेसमध्ये तो सलमान खान, हृतिक रोशन यांना टक्कर देतो. त्याच्या डायटप्लॅनची देखील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.
त्यानं एका मुलाखतीत खुलासा केला की त्यानं आजवर दारूचा एक घोट प्यायलेला नाही. एकदा सलमान खानच्या पार्टीमध्ये त्याला एनर्जी ड्रिंकमध्ये दारू मिक्स करून त्याला प्यायला दिली होती. जेणे करून त्याला त्याची टेस्ट कळणार नाही. सोनूनं सांगितलं की तो शाकाहारी आहे आणि त्याचं डायट खूप साधारण आहे. त्यानं सांगितलं की कोणी घरी आलं तर ते म्हणतात की हे जेवण रुग्णालयात खातात तसं आहे. सोनूच्या म्हणण्यानुसार, घरात फक्त तो एकटाच शाकाहारी आहे.
पुढे सोनूनं सांगितलं की काही सगळे मांसाहारी आहेत. त्यानं खुलासा केला की गेल्या 4 वर्षात चपाती खाल्ली नाही आणि दुपारी त्याला डाळ-भात खायला आवडतं. त्यासोबत सोनूनं तो नाश्त्यामध्ये काय खातो याविषयी देखील सांगितलं आहे. नाश्तामध्ये एग व्हाईट, ऑमलेट, सॅलेड, आव्होकाडो, फ्राय केलेल्या भाज्या किंवा पपई खातो. त्याचं म्हणणं आहे की तो त्याच्या डायटमध्ये कधी चीट करत नाही. मात्र, कधी कधी तो मक्याची भाकरी खातो, कारण त्याचं म्हणणं आहे की कंसिस्टंसी असणं गरजेचं आहे.
हेही वाचा : 'सुहाना खान-खुशी कपूर पेक्षा...', रवीना टंडनची लेक राशा थडानीवर कौतुकांचा वर्षाव
फिटनेसला घेऊन सोनू म्हणाला, त्याचं म्हणणं आहे की एक योग्य डायट आणि नियमितपणे वर्कआऊट करणं शरीराला स्वस्थ ठेवू शकतं. त्याचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे आरोग्या संबंधीत काही सवयी आहेत ज्या नियमितपणे करणे गरजेचं आहे. जेणेकरून खूप काळ ते फिट राहतील. त्यासोबत तो म्हणाला की जर निरोगी राहायचं असेल तर रुग्णालयात मिळणारं जेवण करणं योग्य पर्याय आहे. दरम्यान, त्याचा 'फतेह' हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.