Amanda Bynes Found Naked: हॉलिवूडची अभिनेत्री रस्त्यावर नग्नावस्थेत उतरली, रस्त्यावरुन जाणारे पाहतच राहिले

Amanda Bynes Found Naked: हॉलिवूड अभिनेत्री Amanda Bynes रस्त्यांवर नग्नावस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर तिला मनोरुग्णालयात (psychiatric facility) दाखल करण्यात येणार असून काही दिवस तिथेच उपचार केले जाणार आहे. लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) रस्त्यांवर ती काहीजणांना नग्नावस्थेत फिरताना आढळली.   

Updated: Mar 21, 2023, 04:15 PM IST
Amanda Bynes Found Naked: हॉलिवूडची अभिनेत्री रस्त्यावर नग्नावस्थेत उतरली, रस्त्यावरुन जाणारे पाहतच राहिले title=

Amanda Bynes Found Naked: अमेरिकेतील अभिनेत्री Amanda Bynes सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) रस्त्यांवर ती नग्नावस्थेत आढळली आहे. यानंतर तिला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेनंतर हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

TMZ च्या वृत्तानुसार, 'She's The Man' Star मधील अभिनेत्री अमांडा बायनेस (Amanda Bynes) ने लॉस एंजेलिसमध्ये एका कारला थांबवलं. यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. आपण मनोरुग्ण असून सध्या त्यातून बाहेर पडत असल्याचं तिने चालकाला सांगितलं. यानंतर तिने स्वत: 911 नंबरवर संपर्क साधला आणि जवळचं पोलीस स्थानक गाठलं. याठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असताना तिची मानसिक स्थिती योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तिला वैद्यकीय उपाचारांची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर तिला मनोरुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Amanda Bynes ला बायपोलार डिसऑरर्डरचाही त्रास आहे. तिच्यावर पुढील काही दिवस उपचार केले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. रुग्णाला मनोरुग्ण सुविधेत फक्त 72 तासांसाठी ठेवलं जातं. पण रुग्णाची स्थिती पाहता हा काळ अजून काही दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो. 

अमांडाला 1990 आणि 2000 च्या दशकात टीव्ही आणि चित्रपटांमध्ये दिलेल्या योगदानासाठी ओळखलं जातं. Easy A, She's The Man and What A Girl Wants या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 

PageSix नुसार, अमांडाने भुतकाळात मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येशी लढा दिला आहे. 2013 मध्ये तिला सुरक्षेत ठेवण्यात आलं होतं. गतवर्षी तिची मुक्तता करण्यात आल्यानंतर तिने चाहत्यांचे आभार मानले होते. न्यायाधीशांनी आता  तिच्या कायदेशीर व्यवस्थेची गरज नसल्याचं सांगितलं होतं.