अक्षय कुमार खरंच होता गे? लग्नाआधी काय घडलेलं पाहा 

अक्षय कुमारला आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाला आज बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून पाहिलं जातं. 

Updated: Feb 11, 2022, 04:10 PM IST
अक्षय कुमार खरंच होता गे? लग्नाआधी काय घडलेलं पाहा  title=

मुंबई : सध्या प्रेमाचा महिना सुरुये. १४ फेब्रुवारीला कपल मोठ्या उत्साहात व्हेलंटाईन डे साजरा करतात. बॉलीवूडमध्ये असे अनेक कपल आहेत. ज्यांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे.  अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या खिलाडी कुमारची लव्हस्टोरी सांगणार आहोत. अक्षय कुमारला आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाला आज बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणून पाहिलं जातं. जिथे अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं आहे.

त्याचबरोबर, त्याची पत्नी ब्लॉगर म्हणून काम करते आणि त्याचबरोबर ती इतर अनेक कामंही करते. ट्विंकलने बॉलीवूडमध्ये फार कमी काम केलं आहे आणि तिची कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर तिने बॉलीवूडला गुडबाय केलं. मात्र आजही ट्विंकल चर्चेत आहे. अशा परिस्थितीत या दोघांची लव्हस्टोरी कशी होती ते जाणून घेऊया.

फोटोशूटच्या दरम्यान झाली होती भेट 
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची पहिली भेट मुंबईत फिल्मफेअर मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीत ट्विंकल अक्षयच्या मनात घर करून गेली. याचा उल्लेखही अक्षयने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अक्षयने मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, 'पहिली भेट जयेश सेठच्या फिल्मफेअरच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्या फोटोशूटचे फोटो अजूनही माझ्याकडे आहेत.'

इंटरनॅशल खिलाडीच्या सेटवर पडला प्रेमात
या फोटोशूटनंतर अक्षय आणि ट्विंकल पहिल्यांदाच 'इंटरनॅशनल खिलाडी' चित्रपटात एकत्र आले होते. 'इंटरनॅशनल खिलाडी' हा चित्रपट 1999 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही स्टार्स एकमेकांच्या प्रेमात पडले होते. असं म्हटलं जातं की, एका मुलाखतीदरम्यान अक्षयने सांगितलं होतं की, 'ट्विंकलच्या सौंदर्यापेक्षा तिचा चांगुलपणा पाहून तिच्याकडे आकर्षित झालो होतो.'
 
ट्विंकल खन्नाने 'कॉफी विथ करण' या शोमध्ये एक मजेदार किस्सा सांगितला. ट्विंकलने सांगितलं की, जेव्हा तिचा 'मेला' चित्रपट रिलीज होत होता. तेव्हा तिने अक्षयला सांगितलं की, जर मेला चित्रपट चालला नाही आणि तिची कारकीर्द संपली तर ती अक्षयशी लग्न करेल. यावर अक्षय म्हणाला की, मला माहित होतं की मेला सिनेमा हिट होणार आणि ट्विंकल माझ्याशी लग्न नाही करणार. त्यामुळे मी बॅचलरच राहणार आहे.

डिंपलने ठेवली होती अक्षय आणि ट्विंकलसमोर अट
'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने खुलासा केला होता की, तिची आई डिंपल कपाडियाने अक्षय कुमारसोबतच्या पहिल्या भेटीतच अक्षयला 'गे' समजलं होतं. अशा परिस्थितीत डिंपलने अक्षयच्या ट्विंकलसोबतच्या लग्नाच्या प्रस्तावावर एक अटही ठेवली होती की, दोघांनाही एक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहावं लागेल. जर सगळंकाही ठीक झालं तर लग्नाला परवानगी देतील आणि त्यानंतर दोघंही 7 जानेवारी 2001 रोजी त्यांचं लग्न झालं होतं.