मुंबईः अभिनेता वरूण धवनचा आज 35वा वाढदिवस आहे. यानिमित्त चाहत्यांकडून वरूणवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लग्नानंतर दुसऱ्यांचा वरुण बायको नताशासोबत बर्थडे साजरा करत आहे. त्यामुळे हा बर्थडे सुद्धा वरुणसाठी खास आहे.
पण वरुण आणि नताशाच्या नात्याबद्दल तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की नताशाने वरुणला लग्नापूर्वी अनेक वेळा नकार दिला होता.
वरुण आणि नताशा हे बालपणीचे मित्र आहेत. मानेकजी कूपर या शाळेत पहिल्यांदा दोघे भेटले. सहावीच्या वर्गात पहिल्यांदा वरुण नताशाला भेटला.
12वीपर्यंत ते दोघे खूप चांगले मित्र होते. त्यानंतर आपल्याला नताशा आवडू लागल्याचं वरुणने करिना कपूरच्या एका शोमध्ये सांगितलं होतं.
नताशाकडे प्रेमाची कबुली दिल्यानंतर नताशाने ठाम नकार दिला होता मात्र हार न मानता आपण प्रयत्न सुरू ठेवल्याचं वरुण सांगतो.
अखेर नताशाला वरुणच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर नताशाने वरुणला होकार दिला. त्यानंतर अनेक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते.
त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 24 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लग्न केलं. या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.