Indian Idol फेम Sayli Kamble लवकरचं अडकणार विवाह बंधनात, कोण आहे तिचा जोडीदार?

'चलो जी साफ-साफ कहती हूं, इतनी सी बात है...' सायली कांबळेचा साखरपुडा सोहळा...   

Updated: Apr 24, 2022, 08:39 AM IST
Indian Idol फेम Sayli Kamble लवकरचं अडकणार विवाह बंधनात, कोण आहे तिचा जोडीदार? title=

मुंबई : सिंगिंग रियालिटी शो इंडियन आयडल 12 (Indian Idol 12)ची स्पर्धक सायली कांबळे  (Sayli Kamble) लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. सायलीचा साखरपुडा झाला आहे. खुद्द सायलीने साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र तिच्या साखरपुड्याची चर्चा आहे. नवरीच्या रुपात सायली फारचं सुंदर दिसत आहे. 

सयलीने बॉयफ्रेंड धवससोबत साखरपुडा केला आहे. फोटोत सायलीच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.  सायलीचा बॉयफ्रेंड धवलनेही एंगेजमेंट सेरेमनीदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये धवल आणि सायली एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धवलने सायलीसोबत फोटो शेअर करत रोमँटिक नोटही लिहिली आहे. धवल प्रेम व्यक्त करत म्हणतो, 'प्रत्येक वेळी तू माझ्यासोबत असल्याचं कारण मला माहिती आहे... याचं यादीमध्ये आणखी एक आठवण.. आय लव्ह यू...' सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

सायलीने 4महिन्यांपूर्वीचा फोटो शेअर केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सायली कांबळेने सप्टेंबर 2021 मध्ये बॉयफ्रेंड  धवलसोबत एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. आता साखरपुडा झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.