गोविंदा-करिश्माच्या 'या' गाजलेल्या गाण्याच्या रिमेकमध्ये वरूण-साराची जोडी

बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली जोडी म्हणजे अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची. 

Updated: Jul 9, 2019, 06:23 PM IST
गोविंदा-करिश्माच्या 'या' गाजलेल्या गाण्याच्या रिमेकमध्ये वरूण-साराची जोडी title=

मुंबई : अलिकडे बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे रिमेक साकारण्याचा ट्रेन्ड सुरू आहे. बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली जोडी म्हणजे अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची. या जोडीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. इतकेच नाहीतर आज सुद्धा ९०व्या दशकातल्या या जोडीच्या चर्चा चांगल्याच रंगतात. या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आणि ते हीट देखील ठरले. 

'कुली नं.१' चित्रपटातील 'मैं तो रस्तेसे जा रहा था' या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता हे गाणं वाजलं की चाहत्यांचे पाय या सुपर हीट गण्यावर ताल धरू लागतात. त्यामुळे हे गाणं पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

गोविंदा-करिश्माच्या या गाण्याला हटके अंदाजात चाहत्यांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर नव्याने निर्माण होणाऱ्या गण्यामध्ये गोविंदा-करिश्मा ऐवजी अभिनेता वरूण धवण आणि अभिनेत्री सारा अली खान झळकणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'मैं तो रस्ते से जा था' या गाण्याला तनिष्क बागची संगीतबद्ध करणार आहेत. शिवाय 'कुली नं १' चित्रपटाच्या रिमेकचे चित्रीकरण ५ ऑगस्टमध्ये बँकॉक येथे सुरू होणार आहे. ज्याप्रमाणे चाहत्यांनी गोविंदा-करिश्माच्या जोडीला डोक्यावर घेतले होते, त्याचप्रमाणे वरूण-सारा ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडते की नाही हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.