Laxmikant Berde: ''...आणि सतत हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं'', लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' जुनी मुलाखत

Laxmikant Berde: आज त्यांना जाऊन 19 वर्षे होत आली परंतु त्यांची आठवण आल्याशिवाय मराठी चित्रपटप्रेमी पुढे जात नाहीत. मध्यंतरी त्यांची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. त्यातला एक भाग ऐकून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल.

Updated: Feb 12, 2023, 10:38 PM IST
Laxmikant Berde: ''...आणि सतत हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं'', लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' जुनी मुलाखत title=

Laxmikant Berde: आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगाना हसत हसत सामोरे जात, आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणारे विनोदवीर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde Movies) आज आपल्यात असायला हवे होते अशी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचीच भावना आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी लक्षावधी लोकं आजही त्यांचे सिनेमे पाहतात. त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून ते त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत सगळेच त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. विनोदी कलाकार म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहून शिकावं. त्यांचा प्रत्येक रोल हा रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आपल्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर मात करत त्यांनी यशाचे शिखर गाठले. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare), अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतची त्यांची जोडी ही कायमच प्रेक्षकांच्या लक्षात आहे. (veteran actor laxmikant berde speaks on his early life and on his mother interview goes viral)

आज त्यांना जाऊन 19 वर्षे होत आली परंतु त्यांची आठवण आल्याशिवाय मराठी चित्रपटप्रेमी पुढे जात नाहीत. मध्यंतरी त्यांची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. त्यातला एक भाग ऐकून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. आपल्या आयुष्यातील असाच एक हळवा किस्सा ते या मुलाखतीत सांगताना दिसत आहे. या मुलाखतीत ते आपल्या आईबद्दलची एक हळवी गोष्ट शेअर करताना दिसत आहेत. 

''आमच्या घरातली गरीबी, त्यामुळे असणारं दु:ख हे जिच्या चेहऱ्यावर कधीही पाहिलं नाही. सतत हसत राहणारी, दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी आई, जिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यामुळे लहानपणीचं ठरवलं की मनात जी दु:ख असतील ती आपल्यापाशी ठेवायची आणि सतत हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं'', असं ते म्हणाले. माझी आई अत्यंत आजारी होती. तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं होतं. पण तेव्हा नेमका संप होता त्यामुळे सगळीकडेच गोंधळ होता. त्यात आम्ही माझ्या आईला स्ट्रेचरवर बसवलं. तिला हृदयाचं दुखणं होतं. माझ्या आईचं नावं हे रजनी होतं.

तेव्हा तिला ऑपरेशनसाठी आम्ही घेऊन गेलो. तेव्हा माझ्या आईला पाहून डॉक्टर म्हणाले की हे तुम्ही कोणाला आणलंत? तर आम्ही म्हणालो की रजनी बेर्डे. तेव्हा डॉक्टर म्हणाले की नाही, रजनी शहा यांनी बोलावलं आहे आणि विनोद त्यातला असा की, तिला अबॉर्शेनसाठी आत नेलं होतं. तेव्हा माझी आई ही हसत होतं आणि ती त्याही अवस्थेत प्रांजळपणे म्हणाली, विनोद काय तुलाच करता येत नाहीत तर सुशिक्षित माणसंही विनोद करू शकतात.'', असं ते पुढे म्हणाले.  

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि स्वानंदी बेर्डेही अभिनय क्षेत्रात आहेत. प्रिया बेर्डे अभिनयासह (Priya Berde in BJP) राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.