ज्येष्ठ अभिनेत्रीची कलाजगतातून एक्झिट; हळहळलं सिनेजगत

मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.   

Updated: Oct 16, 2021, 08:32 AM IST
ज्येष्ठ अभिनेत्रीची कलाजगतातून एक्झिट; हळहळलं सिनेजगत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) या चित्रपटातून चर्चेत आलेल्या आणि चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतलेल्य़ा ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जाफर यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर चित्रपटांमधून त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. 

श्वासोच्छवास घेण्यास त्रास 
फारुख जफर (Farukh Jaffer) यांची मोठी मुलगी मेहरु जाफर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. आईची प्रकृती ठीक नसून, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना रुग्णालयात दाखल करण्य़ात आलं होतं. श्वास घेण्य़ास त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असं त्या म्हणाल्या. 

रेडिओपासून कारकिर्दीची सुरुवात 
फारुख जाफर यांनी 1963 मध्ये लखनऊ येथे विविध भारती अनाऊंसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1981 मध्ये त्यांनी 'उमराव जान' या चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. यामध्ये त्या रेखा यांच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्य़ा. स्वदेस, पिपली लाईव्ह, गुलाबो सिताबो यांसारख्या चित्रपटांतूनही त्या झळकल्या होत्या. 

'Gulabo Sitabo' फेम एक्ट्रेस Farukh Jaffer का निधन, Amitabh संग जमी थी जोड़ी

काही कलाकार हे त्यांच्या अभिनय शैलीत असणाऱ्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. फारुख जाफर या त्यापैकीच एक आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या आज आपल्यात नसल्या तरीही कलाकृतींच्या माध्यमातून मात्र त्या सदैव चाहत्यांमध्येच असतील असं म्हटलं जात आहे.