झिनत अमान एअरपोर्टवर येताच सर्वांनी जे पाहिलं ते हैराण करणारं; पाहा Photo

एक काळ गाजवणारी अभिनेत्री अशा रुपात समोर येईल याची कोणीच अपेक्षाही केली नव्हती...

Updated: Oct 24, 2022, 09:16 AM IST
झिनत अमान एअरपोर्टवर येताच सर्वांनी जे पाहिलं ते हैराण करणारं; पाहा Photo  title=
Veteran Bollywood Actress zeenath aman spoteed at airport looks as beautiful as she was

Zeenath Aman : 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आपल्या अभिनयाचा दमदार नमुना सादर करणाऱ्या अभिनेत्री झिनत अमान यांनी कायमच त्यांच्या रुपानंही चाहत्यांना वेड लावलं. एकिकडे घरंदाज स्त्री पात्र साकारण्यात अनेक महिला कलाकार व्यग्र असतानाच झिनत यांनी मात्र आपल्या ग्लॅमरस अदांनी याला शह देण्याचं काम सुरु ठेवलं. झिनत रुपेरी पडद्यावर गाजल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांच्या वाट्याला बरीच आव्हानं आली. ही आव्हानं ओलांडून जाताना त्यांना काही अशा प्रसंगांचाही सामना करावा लागला, ज्याचे परिणाम त्यांच्या रुपावर झाले. (Veteran Bollywood Actress zeenath aman spoteed at airport looks as beautiful as she was)

अशी ही एक काळ गाजवणारी अभिनेत्री, एका वेळची फॅशनिस्ता नुकतीच एके ठिकाणी दिसली. हे ठिकाण होतं Airport. हल्लीच्या काळात सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक (Celebrity Airport Videos) व्हायरल होत असतानाच त्यामध्ये झिनत अमान यांचा एक व्हिडीओ आणि काही फोटो समोर आले.

व्हायरल (Viral Video) होणाऱ्या फोटोंमध्ये त्यांचं वय झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. असं असलं तरीही अभिनेत्रीचं सौंदर्य मात्र तिळमात्रही कमी झालेलं नाही. राखाडी केस, काळ्या रंगाचं आऊटफिट, डोळ्यांवर मोठ्या फ्रेमचे सनग्लासेस अशा एकंदर रुपात झिनत ज्यावेळी समोर आल्या तेव्हा अनेकजण या अभिनेत्रीच्या सौंदर्याला न्याहाळत राहिले.

अधिक वाचा : 'मला ब्रेस्ट पॅड लावून...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

She Aged like a fine wine अशाच कमेंट्स त्यांच्या या लूकवर अनेकांनीच केल्या. (Zeenat Aman age) वयानं सत्तरीचा टप्पा गाठलेला असला तरीही ‘अभी तो हम जवां है’ असंच जणू झिनत यांचं रुप सांगत होतं, हेच त्यांच्या फोटोकडे पाहून म्हणावंसं वाटतं.

हिंदी कलाजगतामध्ये अशा अनेक अभिनेत्री झाल्या, ज्या उतारवयातही तितक्याच लोकप्रिय ठरल्या. झिनत अमान यासुद्धा त्याच यादीतल्या एक अभिनेत्री. नाही का..?