'मला ब्रेस्ट पॅड लावून...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 23, 2022, 08:28 PM IST
'मला ब्रेस्ट पॅड लावून...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : अभिनय क्षेत्रात करिअर करणं सोपं नाही. तिथे प्रत्येकाला स्ट्रगल हे करावच लागतं. बऱ्याच वेळा कलाकारांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर सेलिब्रिटींना भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो. असाच भयानक अनुभव एका अभिनेत्रीला आला तिनं कशा प्रकारे काम केलं ते वाचून तुम्हाली धक्काबसेल.

या अभिनेत्रीचं नाव पायल राजपूत आहे. तिचं नाव समोल आल्यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अल्पावधीतच पायलनं स्वत: ची जागा मिळवली. पायलनं तिच्या आगामी प्रोजेक्टच्या निमित्तानं काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी या ग्लॅमर दुनियेच्या पाठी काय होतं हे तिनं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी बोलताना पायल म्हणाली, 'मला सुरुवातीच्या काळात अधिक आकर्षक दिसावं म्हणून ब्रेस्ट पॅड लावावे लागत होते. मी त्याला नकार दिला तर निर्माते नाराज व्हायचे. तुला अधिक बोल्ड आणि मादक दिसण्यासाठी हे करावं लागेल असे मला सांगण्यात आलं. त्यामुळे माझा नकार असूनही मला त्या गोष्टीचा उपयोग करावा लागला होता.'

पायल लवकरच सनी लिओनी आणि विष्णु मंचु यांच्यासोबत 'गियाना' या चित्रपटात दिसणार आहे. सुर्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीनंतर पायल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.