हैरान हूँ मै....! लाखात एक होत्या लतादीदी, कुंडलीतच लिहिलेलं लखलखणारं नशीब

फार कमी वयात आलेली कुटुंबाची जबाबदारी, स्वत:च्या अस्तित्वासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि सरतेशेवटी मिळालेली अतुलनीय प्रसिद्धी, लोकप्रियता हे एका दिवसात मिळालेलं नव्हतं. 

Updated: Feb 7, 2022, 04:47 PM IST
हैरान हूँ मै....! लाखात एक होत्या लतादीदी, कुंडलीतच लिहिलेलं लखलखणारं नशीब  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  लता मंगेशकर यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आलं. अर्थात भारत रत्ननं त्यांचा सन्मान करण्यात आला. देशातील संगीत क्षेत्रामध्ये बहुमुल्य योगदान देणाऱ्या आणि अनेकांच्या आदर्शस्थानी असणाऱ्या लतादीदींनी इथवर पोहोचण्यासाठी संघर्षही तितकाच केला. (Lata mangeshkar)

फार कमी वयात आलेली कुटुंबाची जबाबदारी, स्वत:च्या अस्तित्वासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि सरतेशेवटी मिळालेली अतुलनीय प्रसिद्धी, लोकप्रियता हे एका दिवसात मिळालेलं नव्हतं. 

दीदींनी यासाठी मेहनत घेतली आणि अर्थातच त्यांना नशिबाचीही साथ होती. दैवी स्वरांची देणगी लाभलेल्या दीदींवर परमेश्वराचा वरदहस्त होता. 

आज दीदी आपल्यात नाहीत, पण या चमत्काराबद्दलची माहिती मात्र पावलोपावली आपल्याला थक्क करत आहे. 

1929 मध्ये जन्मलेल्या लतादीदींच्या नशीबाबद्दल म्हणावं तर त्यांच्या कुंडलीमध्ये महाभाग्य योग असल्याचं म्हटलं गेलं. प्रसिद्ध कर्मजीवी होण्याचा योगही त्यांच्या नशीबात निर्धारित होता. 

बृहत् पराशर शास्त्रानुसार कोणत्याही महिलेच्या कुंडलीत रात्रीचा जन्म किंवा लग्न, चंद्र आणि सूर्य तीम सम राशींमध्ये असेल तर महाभाग्य योग बनतो. 

अतीशर दुर्लभ अशा महाभाग्य योगाच्या बळावर दीदींनी संगीत साधनेच्या आधारे असिमीत लोकप्रियता मिळवली. 

EXCLUSIVE : जेव्हा माणसातला देव गानसरस्वतीला जगण्याचा संघर्ष हरताना पाहतो....

 

कुंडलीत सप्तम भावाचे अधिपती मंगळाचे सहाव्या भावात केतुसह असण्यामुळे त्या आजीवर एक अविवाहित साधकच राहिल्या. 

1953 ते 1973 या वीस वर्षांमध्ये त्यांना सर्वाधिक यश प्राप्त झालं. जवळपास सात दशकांहून अधिक काळ संगीतसाधनेसाठी वेचणाऱ्या या गानसरस्वतीचं भाग्य हे तिच्यासोबतच परलोकी गेलं. 

ज्यामुळं पुन्हा लतादीदी होणे नाही, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.