बॉलिवूडचा व्हिलन अशीही आहे 'या' अभिनेत्याची ओळख, आता मुलगाही गाजवतोय सिनेइंडस्ट्री.. 'हा' दिग्गज अभिनेता ओळख पाहू

आपल्या दमदार अभिनयामुळे सिनेविश्वात त्याने त्याची खास ओळख निर्माण झाली. 

Updated: Sep 9, 2022, 05:55 PM IST
बॉलिवूडचा व्हिलन अशीही आहे 'या' अभिनेत्याची ओळख, आता मुलगाही गाजवतोय सिनेइंडस्ट्री.. 'हा' दिग्गज अभिनेता ओळख पाहू  title=

Jackie Shroff Childhood Photo: आईसोबत काढलेल्या या ब्लॅक एण्ड व्हाईट फोटोतला लहान मुलगा तुम्ही ओळखू शकता का? हा मुलगा मोठा होऊन बॉलीवूडचा नायक बनला आणि आपल्या दमदार अभिनयामुळे सिनेविश्वात त्याने त्याची खास ओळख निर्माण झाली. 

जवळपास 3 दशके चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याने सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला. पण आता त्याचं नाव मोठ्या बॉलीवूड कलाकारांच्या यादीत घेतलं जात. आणि आता त्याचा मुलगाही सिनेसृष्टीत मोठा स्टार आहे. 

जर तुम्हाला अजूनही ओळखता येत नसेल तर सांगूया की हा जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आहे, ज्यांनी 1983 मध्ये 'हीरो' (Hero) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ज्यांना चित्रपटसृष्टीत जग्गू दादा म्हणून ओळखले जाते. जॅकी यांचा हा पहिला चित्रपट 'हीरो' जबरदस्त हिट ठरला होता. पहिल्याच चित्रपटातून जॅकी यांनी प्रेक्षकांमध्ये निर्माण केलेले स्थान आजही अबाधित आहे.

जॅकी श्रॉफ यांनी 'हीरो' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, त्याकाळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. जॅकी यांचे बालपण चाळीत गेले होते. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुभाष घई (Subhash Ghai) यांनी जय किशन श्रॉफ (Jai Kishan Shroff) यांचे नाव बदलून जॅकी श्रॉफ असे ठेवले होते. जॅकी हे मुंबईत वाढल्यामुळे ते मराठीही अस्खलित बोलतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जॅकी श्रॉफ यांनी गेल्या 3 दशकात लोकप्रिय चित्रपटांमधून काम केले आहे. पत्नी आयशा आणि मुलगा टायगर श्रॉफ (Tiger Shroff), मुलगी कृष्णा श्रॉफसोबत (Krishna Shroff) सध्या फॅमिली टाईम स्पेंड करत आहेत. सध्या टायगर श्रॉफ हा हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी एक्शनपट करतो आहे.