विकी कौशलचा ब्रोमॅन्स पाहिलात का?, थेट स्विमिंगपूल मध्ये घडला 'तो' प्रकार...

विकीने क्लीन-शेव केलेला लूक दाखवून त्याच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. 

Updated: Jul 17, 2022, 10:25 PM IST
विकी कौशलचा ब्रोमॅन्स पाहिलात का?, थेट स्विमिंगपूल मध्ये घडला 'तो' प्रकार... title=

मुंबईः बॉलीवूडचे आवडते जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या मालदीवच्या सुट्टीदरम्यान धमाका करताना दिसत आहेत. विकीने नुकतेच त्याच्या बॉय गँगसोबत नवीन फोटो टाकले आहेत. इंस्टाग्रामवर विकीने फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये त्याचा ब्रोमॅन्स चांगलाच व्हायरल होतो आहे. 

फोटोमध्ये विकी, त्याचा भाऊ, अभिनेता सनी कौशल, चित्रपट निर्माते कबीर खान, आनंद तिवारी आणि त्यांचे काही कुटुंब आणि मित्र आहेत. विकीने क्लीन-शेव केलेला लूक दाखवून त्याच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. 

कतरिनाने नुकताच तिचा 39 वा वाढदिवस तिच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत एका अननोन ठिकाणी साजरा केला. सुरुवातीला विकीने त्याच्या दोन मैत्रिणी, टेलिव्हिजन होस्ट मिनी माथूर आणि चित्रपट निर्माती करिश्मा कोहली यांच्यासह एक फोटो टाकला. खरंतर या पोझमध्ये केलेला ब्रोमॅन्स चाहत्यांसाठी धक्का देणारा आहे. कारण कतरिनाच्या वाढदिवशी आपल्या मित्रांसह विकी कौशल स्विमींग पूलमध्ये काय करतोय यावरही अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. 

विकीने सोशल मीडियावर कतरिनाचा एक सुंदर फोटो टाकला आहे आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.. त्याने लिहिले आहे की, “बार बार दिन ये आये… बार बार दिल ये जाए. हॅप्पी बर्थडे माय डार्लिगं.. '' अशी त्याची रॉमेंटिक पोस्ट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी लवकरच 'गोविंदा नाम मेरा', सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकरचा एक चित्रपट, आनंद तिवारीचा चित्रपट आणि सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्यासोबत मेघा गुलजारचा 'सॅम बहादूर या चित्रपटात दिसणार आहे. कतरिना कैफ लवकरच इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत फोन भूत'मध्ये दिसणार आहे आणि सलमान खानसोबत 'टायगर 3' आणि विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस'मध्ये देखील ती दिसणार आहे.