Vicky Kaushal चा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

Vicky Kaushal चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Nov 19, 2022, 10:40 AM IST
Vicky Kaushal चा 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. विकीनं आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, विकी गेल्या काही दिवसांपासून 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. अशातच विकीनं त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट कधी प्रदर्शित होणार या विषयी विकीनं सांगितलं आहे. 

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित 

विकीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विकीनं चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'गोविंदा नाम मेरा, नाचना काम मेरा. लवकरच माझी कहानी घेऊन येणार आहे. 16 डिसेंबर रोजी फक्त Disney+ Hotstar, असं कॅप्शन विकीनं दिलं आहे. विकीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (Vick Kaushal Instagram Viral Post)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकीच्या या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) देखील दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विकीची डान्सरची भूमिका आहे. चित्रपटात विकीची पत्नीशिवाय एक मैत्रीणही असणार आहे. चित्रपटात विकी घर मिळवण्यासाठी सतत धडपड करताना दिसतोय. चित्रपटाच्या नावावरून हा अभिनेता गोविंदाची बायोपिक (Govinda's Biopic) आहे असे अनेकांना वाटतं. करण जोहरनं (Karan Johar) नुकताच एक व्हिडीओ शेअर करत ही गोविंदावर (Govinda) असलेली बायोपिक नसून एका डान्सरनं केलेल्या स्ट्रगलची आहे. (vicky kaushal film govinda naam mera release date out will be streamed on disney plus hotstar) 

हेही वाचा : साडी नीट करताना सरकला पदर अन् काजोल झाली Kajol Oops Moment ची शिकार!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, चित्रपटाच्या निमित्तानं विकीसोबत पहिल्यांदाच भूमि पेडणेकर आणि कियारा अडवाणी हे स्क्रिन शेअर करणार आहेत. आता या तिघांची केमिस्ट्री कशी आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उस्तुक आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.