विकीच्या कोणत्या गुणांवर भाळली कतरिना, पाहा खुलासा करत काय म्हणते...

'तो' व्हिडीओ समोर आलाच

Updated: Dec 6, 2021, 02:59 PM IST
विकीच्या कोणत्या गुणांवर भाळली कतरिना, पाहा खुलासा करत काय म्हणते...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचा क्षण जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसं प्रत्येक लहानसहान माहिती चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे. अतिशय दिमाखदार सोहळ्यामध्ये विकी- कतरिनाची जोडी साता जन्मांच्या एका प्रवासाची सुरुवात करणार आहेत. 

विकी आणि कॅट त्यांच्या सहजीवनाची सुरुवात करण्यापूर्वी आता काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 

असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. विकी आणि कतरिनाचं नातं कसं जुळलं, असा प्रश्न पडणाऱ्यांच्या अनेक शंका या व्हिडीओतून दूर होत आहेत. 

कोणाही पुरुषामध्ये तुला असे कोणते तीन गुण अधिक लक्षवेधी वाटतात, असाच प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये करण्यात आला होता. 

आपल्याला विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर देत तिनं म्हटलेलं, पहिलं तर तुम्हाला काय हवंय ते स्वत:ला ठाऊक असलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीची विनोदबुद्धी आणि तिसरं म्हणजे त्या व्यक्तीला येणारा सुगंध... 

कतरिनाची ही तिसरी अट लक्ष वेधणारी आहे. पण, आता ही ज्याचीत्याची आवड झाली. असो... विकीमध्ये कतरिनाला हेच गुण आवडले आणि अखेर ही जोडी येत्या काहीदिवसांमध्ये लग्नबंधनात अडकतेय. 

विकी आणि कतरिनाची केमिस्ट्री आणि बॅकग्राऊंडला चालणारं गाणं सर्वांच्याच मनाचा ठाव घेत आहे. त्यामुळं हा व्हिडीओ सध्या संपूर्ण माहोलाला चार चाँद लावत आहे असं म्हणायला हरकत नाही.