शुभमन गिल नाही, तर 'या' खस व्यक्तीसोबत सारा तेंडुलकर निघाली डेटला

साराच्या मनात राज्य करणारी 'ती' व्यक्ती नक्की आहे तरी कोण?  

Updated: Dec 6, 2021, 02:56 PM IST
शुभमन गिल नाही, तर 'या' खस व्यक्तीसोबत सारा तेंडुलकर निघाली डेटला

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान फलंदाज शुभमन गिल त्याच्या बॅटिंगमुळे प्रचंड चर्चेत आहे. शुभमन गिल फक्त त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर लूकमुळेही चर्चेत असतो. मध्यतंरी शुभमन गिलच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधलं. शुभमन गिलचं नाव क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं.  असं असताना सारा शुभमनसोबत नाही तर दुसऱ्या व्यक्तीसोबत डेटला गेली. 

सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा स्वतःविषयीच्या दिवसभरातील घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील सारा इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो  शेअर केले. फोटोंमध्ये ती कोणासोबततरी डेटवर गेल्याचं दिसून येत आहे. 

साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असलेल्या व्याक्तीचा हात धरला आहे. सारासोबत असलेली ही व्यक्ती शुभमन गिलनसून साराची खास मैत्रीण कनिका कपूर आहे. सध्या सारा आणि कनिकाचे फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. 

शुभमन गिलच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनीही आपल्या नात्याबद्दल आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांवर कमेंट करत असतात. दोघांच्या अफेअरच्या बातम्याही अशाचप्रकारे गाजल्या.