चालता-चालता सरकला अजय देवगणच्या मेव्हणीचा ड्रेस; अभिनेत्रीचा Oops Moment कॅमेरात कैद

तनिषा सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहच्या बर्थडे पार्टीत पोहोचली होती. 

Updated: Oct 8, 2022, 05:10 PM IST
चालता-चालता सरकला अजय देवगणच्या मेव्हणीचा ड्रेस; अभिनेत्रीचा Oops Moment कॅमेरात कैद title=

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणची मेहुणी आणि काजोलची धाकटी बहीण आणि अभिनेत्री तनीषा मुखर्जी बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसली नाही परंतु ती अनेकदा चित्रपट पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये स्पॉट होते.

अलीकडेच तनिषा सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेहच्या बर्थडे पार्टीत पोहोचली होती. यादरम्यान तिने स्पार्कलिंग सिल्व्हर कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तनिषा खूपच सुंदर दिसत असली तरी ड्रेसच्या डीप नेकमुळे ती पुन्हा पुन्हा अस्वस्थ होताना दिसली.

ड्रेस पुन्हा पुन्हा एडजस्ट करावा लागला
व्हायरल व्हिडिओमध्ये, तनिषा मुखर्जी कॅमेऱ्यासाठी पोज देताना तिचे कपडे एडजस्ट करताना दिसत आहे. बरं, पार्टीत तनिषाने लूज सिल्व्हर कलरचा चमकणारा शॉर्ट ड्रेस घातला होता. ज्यात प्लंगिंग नेकलाइन होती. तनिषाने हा लूक पुर्ण करण्यासाठी कमीत कमी मेकअप, आणि केस मोकळे ठेवत तिचा लूक पूर्ण केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आम्ही तुम्हाला सांगतो की तिची मोठी बहीण काजोलप्रमाणे तनिषा मुखर्जीचं करिअर यशस्वी ठरलं नाही. तनिषाने 2003 मध्ये 'शश्श...' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही.

यानंतर तिने 'नील अँड निक्की', 'सरकार', 'टँगो चार्ली', 'वन टू थ्री' आणि 'सरकार राज' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र यानंतरही तनिषाचे करिअर काही फारस चाललं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. याशिवाय ती 'बिग बॉस 7' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. 'खतरों के खिलाडी' या स्टंट रिअॅलिटी शोच्या 7व्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.