राखी सांवतच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच देणार दोन मुलांना जन्म?  

राखीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

Updated: Jul 12, 2022, 08:58 PM IST
राखी सांवतच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच देणार दोन मुलांना जन्म?   title=

मुंबई : राखी सावंतचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला समजेल की, राखी सावंतला फक्त 'ड्रामा क्वीन' म्हटलं जात नाही तर ती खरंच एक मोठी ड्रामा क्वीन आहे. नुकताच राखीने तिचा नवा बॉयफ्रेंड बनवला आहे. दरम्यान, राखीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे. तिने तिच्या टी-शर्टमध्ये काहीतरी भरलं आहे, जे पाहून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.

राखी सावंतने तिच्या पोटात दोन फुगे टाकल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्यामुळे तिचे पोट खूपच मोठं दिसत आहे. त्यानंतर तिने तिचं नेहमीप्रमाणे नाटक सुरू केलं. ती तिच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीला सांगते की, "देवाने मला सांगितलं आहे की मी अशा देवदूत, अशा पैगंबरला जन्म देईन, जो अशा पाप करणाऱ्यांना... यानंतर बाजूला इशारा करून ती म्हणते, "माझी मुलं आहेत. अशा सर्व लोकांना सुधारणार आहे, जे खूप पाप करतात."

याचबरोबर राखी सावंत तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला विचारलं, 'बाहुबली येणार आहे का?' यावर राखी सावंत जोरात ओरडू म्हणते की, "हो, बाहुबली येईल, लवकरच, मला अशा पाप्यांना सुधारायचे आहे." बाहुबली येणार आहे. लवकरच..'' राखीचं हे  कृत्य पाहून तिथे उभ्या असलेल्या लोकांना हसू आवरत नाही. यानंतर, राखी सावंतसोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीने फुगे काढून ड्रामा क्वीनच्या नाटकाचा पर्दाफाश केला. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

0राखी सावंत अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. राखी सावंतबाबत रोज काही ना काही बातम्या येत असतात. नुकताच राखीने तिचा नवा बॉयफ्रेंड बनवला आहे. आता राखी सावंतचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे