VIDEO: 'God, Sex And Truth' ला विरोध करणा-यांना असे मिळणार सडेतोड उत्तर!

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅन्ड ट्रुथ’ हा सिनेमा २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात पॉर्न स्टार मिया मालकोवा मुख्य भूमिकेत आहे.

Updated: Jan 23, 2018, 11:38 AM IST
VIDEO: 'God, Sex And Truth' ला विरोध करणा-यांना असे मिळणार सडेतोड उत्तर!  title=

मुंबई : बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅन्ड ट्रुथ’ हा सिनेमा २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात पॉर्न स्टार मिया मालकोवा मुख्य भूमिकेत आहे.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या ट्रेलरने चांगला धुमाकूळ घातला आहे. काही लोकांनी या सिनेमाला विरोध केला आहे. पण राम गोपाल वर्माने सर्वांचं तोंड बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या सिनेमाला विरोध करणा-यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून गमतीदार उत्तर दिलं आहे. 

राम गोपाल वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानी लिहिले की, ‘मी काल्पनिक प्रदर्शन करणा-यांना मारत आहे, जे ‘गॉड, सेक्स आणि ट्रुथ’चा विरोध करत आहेत’. राम गोपाल वर्मा हा सिनेमा २६ जानेवारीला मिया मालकोवाचं चॅनल मिया विएमोव रिलीज करणार आहे. 

 

Me beating the shit out of imaginary protestors of @mia_malkova ‘s #GodSexTruth

A post shared by RGV (@rgvzoomin) on

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राम गोपाल वर्माने या सिनेमाबाबत बोलताना लिहिले होते की, ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ ना सिनेमा आहे, ना सीरिज...ही फिल्म मिया मालकोवाचं सेक्सबद्दल आपलं मत सांगणे आणि हे तिच्यासाठी किती महत्वाचं आहे, याबाबत आहे. मी एक व्यक्ती आणि फिल्ममेकर म्हणून ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ च्या आतल्या बाजूला वास्तविक रूपात सादर करण्यात विश्वास ठेवतो’.