रात्री उशिरा कपडे सांभाळत पळत होती अभिनेत्री; व्हिडिओ Viral

टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या क्यूट स्टाईलने वर्चस्व गाजवते.

Updated: May 24, 2022, 04:09 PM IST
रात्री उशिरा कपडे सांभाळत पळत होती अभिनेत्री; व्हिडिओ Viral title=

मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या क्यूट स्टाईलने वर्चस्व गाजवते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे एकामागून एक सुंदर व्हिडिओ येत आहेत. ज्यामध्ये तेजस्वीच्या बिंधास्त स्टाईलबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. कॅमेरे पाहून ती विचित्र वागू लागते. खरंतर रात्री उशिरा शूटिंग केल्यावर अनेकदा अभिनेत्री इतकी थकून जाते की, तिला लवकर घरी जावंसं वाटतं. अशा परिस्थितीत ती कॅमेऱ्यांपासून दूर राहण्यासाठी मजेशीर मार्ग शोधते.

तेजस्वीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
तेजस्वीचा असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 'नागिन'च्या शूटिंगनंतर तेजस्वीला सेटवर पापाराझींनी पाहिलं होतं. यादरम्यान तेजस्वीने गुलाबी सॅटिन नाईटीमध्ये आपला लूक लपवला होता. कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सेटवरून येताच तिच्या वेनिटीकडे वेगाने धावत जाताना दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धावत असताना तेजस्वीची नाईटी उघडली
तेजस्वी तिची नाईटी धरून व्हॅनिटीकडे धावत होती. तेव्हा धावता-धावता तिची नाईटी उघडली. मात्र, यावेळी तेजस्वीने सोनेरी रंगाचा सुंदर नागिन कॉस्ट्यूम परिधान केला होता. हा व्हिडिओ पापाराझी वायल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.