व्हिडिओ: पार्टीवेअर लूकमध्ये श्रीदेवी

श्रीदेवी ठिकाणी जात त्या ठिकाणचे वातावरण त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारून जात असे. मग ते ठिकाण चित्रिकरणाचा सेट असो किंवा एखादी पार्टी.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 25, 2018, 03:26 PM IST
व्हिडिओ: पार्टीवेअर लूकमध्ये श्रीदेवी title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांनाही चटका लावणारा. त्यांच्या मृत्यूची बातमी इतक्या सहजपणे पचणारी नाही. त्याला कारण त्यांचे व्यक्तिमत्व. त्या ज्या ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणचे वातावरण त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारून जात असे. मग ते ठिकाण चित्रिकरणाचा सेट असो किंवा एखादी पार्टी. या बातमीतील व्हिडिओही असाच. त्यांच्या पार्टीवेअर लूकचे हटके दर्शन घडवणारा.

श्रीदेवींना पाहने म्हणजेचे सौंदर्याची अनुभूती

अभिनेत्री श्रीदेवी या उत्कृष्ट अभिनयासाठी तर ओळखल्या जातच. पण, त्याचसोबत एक स्टायलीश व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ओळख होती. एखादा कार्यक्रम किंवा पार्टी यांमध्ये उंची साडी किंवा ड्रेस, हटके डिजाईनचे दागिणे, विशिष्ट बनावटीची पादत्रानं लक्षवेदी केशभुषा, हाताच्या बोटांमध्ये घातलेल्या आणि नजर खिळवून ठेवणाऱ्या हिऱ्याच्या आंगठ्या. त्याच हातात असलेली महागडी पर्स या सर्व गोष्टींमध्ये श्रीदेवींना पाहने म्हणजेचे सौंदर्याची अनुभूतीच जणू. स्वत:ला मेटेंन ठेवण्याबाबत त्या प्रचंड दक्ष असत. असेही सांगितले जाते की, स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी त्या दिवसाकाठी म्हणे, २५ लाख रूपये खर्च करायच्या. आता खरे खोटे त्यांनाच माहित, पण या खर्चाबाबत प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगायची.

सौंदर्यासाठी करायच्या प्रचंड खर्च

प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्यांनुसार, श्रीदेवी आपल्या सौंदर्यावरही तितकाच खर्च करत असत. सांगितले जाते की, त्या महागडी सौंदर्य प्रसाधने खरेदी करत. ज्याची किंमत काही हजारांमध्ये असे. ब्यूटी क्लिनिकमध्ये जाऊन त्या आपल्या त्वचेवरही अनेक महागडे उपचार करत असत. श्रीदेवींचे कपडे, चप्पल आणि पर्स यांची किंमत काही लाखांमध्ये असे. त्या अनेकदा विदेशात फिरायला जात असत. अशीही चर्चा होती की, त्यांचा खर्च इतका होता की, तो न पेलल्याने बोनी कपूर यांना नोकरी करावी लागली. त्यांच्यावर प्रचंड खर्चही झाला.