सर्वात कमी बजेट असणारा चित्रपट, 'ही' अभिनेत्री कारमध्ये बदलायची कपडे, रिलीज होताच ठरला सुपरहिट

2012 मध्ये रिलीज झालेलल्या एका चित्रपटाने थिएटरमधील लोकांना शेवटपर्यंत बसण्यास भाग पाडले. कमी बजेटच्या चित्रपटाने केली होती प्रचंड कमाई. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 5, 2024, 07:43 PM IST
सर्वात कमी बजेट असणारा चित्रपट, 'ही' अभिनेत्री कारमध्ये बदलायची कपडे, रिलीज होताच ठरला सुपरहिट title=
Vidya Balan : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये काही चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. असाच एक चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. हा चित्रपट 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. निर्मात्यांचे इतके कमी बजेट होते की प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या कारमध्ये कपडे बदलावे लागत होते. 
 
मात्र, ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. थिएटरमधील प्रेक्षकांना देखील या चित्रपटाच्या काहानीने शेवटपर्यंत बसायला लावले. या चित्रपटाने निर्मात्यांना श्रीमंत केले. चित्रपटाने बजेटच्या साडेतीनपट जास्त कमाई केली. या चित्रपटाचे नाव 'कहानी' आहे. 
 
सर्वात कमी बजेटमधील चित्रपट
 
'कहानी' हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी नुकतीच या चित्रपटाच्या निर्मितीची आठवण करून दिली. हा चित्रपट बनवण्यासाठी किती बजेट होते. हे त्यांनी मॅशेबल इंडियाशी संवाद साधताना सांगितले आहे. ते म्हणाले की, आम्ही व्हॅनिटी व्हॅनही आणू शकलो नाही. आमच्याकडे इतके पैसेही नव्हते. आमचे बजेट कमी असल्यामुळे आम्ही शूटिंग काही काळ थांबवू शकलो नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी विद्या बालन हिला कपडे बदलावे लागायचे. तेव्हा आम्ही तिची इनोव्हा रस्त्याच्या मधोमध काळ्या कपड्याने झाकून टाकायचो. ती आत कपडे बदलायची आणि मग बाहेर पडायची. 
 
'कहानी' चित्रपटाआधी तीन चित्रपट फ्लॉप
 
'कहानी' चित्रपट बनवण्याआधी सुजॉय घोषचे लागोपाट तीन चित्रपट फ्लॉप ठरले होते. याविषयी बोलतना ते म्हणाले की, अपयशानंतर विद्या बालन 'कहानी' चित्रपट करण्यास नकार देऊ शकली असती. परंतु, मी पाहिले आहे की त्या पिढीतील कलाकार अमिताभ बच्चनपासून ते शाहरुख खान पर्यंत ज्यांनी वचन दिले ते नक्कीच पूर्ण करतात. विद्या बालनने देखील ते पूर्ण केले. 
 
'कहानी' चित्रपटाची कथा 
 
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहानी' या चित्रपटात एकही मोठा कलाकार नव्हता. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात विद्या बालन कोलकाता येथे जाऊन तिच्या नवऱ्याचा शोध घेत असते. मात्र, तिचा नवरा बेपत्ता होणे आणि विद्या बालन नवऱ्याचा शोध घेणे यावर ही कथा आहे. IMDb ने या चित्रपटाला 10 पैकी 8.1 रेटिंग दिले आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर देखील पाहू शकता.