चित्रपटात काम मिळत नाही का? अंगूरी भाभीच्या डायलॉगवर व्हिडीओ केल्यानं Vidya Balan ट्रोल

Vidya Balan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विद्याचा हा मजेशीर व्हिडीओ काही लोकांच्या पसंतीस उतरला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 

Updated: Jan 11, 2023, 06:04 PM IST
चित्रपटात काम मिळत नाही का? अंगूरी भाभीच्या डायलॉगवर व्हिडीओ केल्यानं Vidya Balan ट्रोल title=

Vidya Balan Video On Bhabi Ji Ghar Par Hai's Actress Anguri Bhabi : बॉलिवूड अभिनेत्री विद्दा बालनं (Vidya Balan) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच विद्दानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. विद्दा बालनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत विद्दा ही 'भाभी जी घर पर है' (Bhabi Ji Ghar Par Hai!) या मालिकेतील अंगूरी भाभीच्या डायलॉगवर लिप सिंग करताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच काय तर भाभी जी घर पर है या मालिकेतील अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रेनेही (Shubhangi Atre) विद्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओत विद्या बालन अंगुरी भाभीचा तो डायलॉग बोलते ज्यात, अरे सच्ची विभूती जी क्या है ये। चुपचाप बैठिए और वहां पर देखिए, वैसे भी आप हमें से सेंसुअस कर रहे हैं। यावर विभूती नारायण तिला करेक्ट करत बोलतो की भाभी जी वो कॉन्शियस होता है।’ हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत विद्दानं कॅप्शन दिलं की 'इंग्रजी एक सेंसुअस भाषा आहे.' 

हेही वाचा : Aashiqui चित्रपटामुळे अभिनेत्री अनु एका रात्रीच झाली स्टार, मग अचानक का घेतला संन्यास?

विद्याच्या या व्हिडीओवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, 'तुम्ही शिल्पा शिंदेपेक्षा (Shilpa Shinde) चांगले एक्सप्रेशन देत आहात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भाभी तुम्ही खूप गोंडस आहात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'विद्या जी चित्रपटात काम मिळत नाही, त्यामुळे इथे काम करत आहेस का? तू तर एकटीच चित्रपट हिट करतेस, मग इन्स्टाग्रामवर व्हिडीओ का बनवतेयस.' सोशल मीडिया अशा अनेक कमेंट्स करत त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणाली, 'मी उठल्याबरोबर हा रील व्हिडीओ पाहिला. मी खूप आनंदी आणि उत्साही होते. कधीकधी, अशा ट्रेंडिंग ऑडिओवर काही रील्स असतात जे आम्ही दोघांनी बनवले आहेत आणि मला वाटते आमच्या निवडी सारख्या आहेत. मी बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा करत होती की विद्या पुढे काय बनवणार आहेत. तर मी माझ्याच एका डायलॉगवर त्यांना अभिनय करताना पाहिले. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. तर मला कधी तरी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे.'