'ती अशी पाहत होती की...' करीनासोबत इंटिमेट सीन देताना नर्व्हस झाला विजय वर्मा

Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करीनासोबत इंटिमेट सीन देण्याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 19, 2023, 05:47 PM IST
'ती अशी पाहत होती की...' करीनासोबत इंटिमेट सीन देताना नर्व्हस झाला विजय वर्मा title=
(Photo Credit : Social Media)

Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा सध्या त्याच्या ‘जाने जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विजय वर्मा हा बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम ही सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, यावेळी विजयनं सांगितलं की तो या चित्रपटात करीनासोबत रोमॅन्टिक झाला आहे. करीनसोबत रोमॅन्टिक सीन देत असताना तो किती नर्व्हस होतो याविषयी देखील त्यानं सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्याला कळत नव्हते की चित्रपटाचे सीन्स कसे करावे. 

विजयनं शहनाज गिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला करीना कपूरसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी विचारण्यात आलं. यावेळी उत्तर देत विजय म्हणाला की करीना ही खूप अप्रतिम अभिनेत्री आहे. विजय म्हणाला की 'सीन होता जिथे करीना माझ्याकडे एका खास अंदाजात पाहत होती आणि गाण गात होती. जसा तो सीन सुरु झाला तसा मला घाम फुटला. तुम्ही तिला हॅन्डल करू शकत नाही, ती खूप हॉट आहे. आम्ही आधीपासून तिचे चित्रपट पाहत आलो आहोत. तिच्या अभिनयावर शिट्या वाजवण्यात येतात. तिच्या सुंदरतेचे लाखो चाहते आहेत. तुम्हाला जी व्यक्ती खूप आवडते आणि तिच व्यक्ती तुमच्या कामाची स्तुती करते तेव्हा थोडं वेगळ वाटतं. पण तुम्ही त्या गोष्टीचा देखील आनंद घेता.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शहनाज म्हणाली की करीना खूप हॉट आहे ना. त्यावर उत्तर देत विजय म्हणाला, 'ती खूप सुंदर आहे आणि जेव्हा ती पर्फॉर्म करते तेव्हा ती आणखी सुंदर दिसते. तिचा एक खास अंदाज आहे.' 

काही दिवसांपूर्वीच जाने जानचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी करीनानं विजयची स्तुती केली होती. करीना म्हणाली की 'सैफनं तिला खूप जास्त मेहनत करण्याचा सल्ला दिला होता, कारण ती जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत काम करणार होती. त्यावेळी करीनानं त्या दोघांची भरभरून स्तुती केली.' 

हेही वाचा : #MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड?

करीनाच्या याच कमेंटवर जेव्हा विजयला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विजय म्हणाला, हा तिचा मोठेपणा आहे आहे की त्यांनी माझे आणि जयदीपविषयी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. खरंतर त्यांना ही बोलायची गरज नव्हती, पण त्यांनी आमची स्तुती केली तर ते ऐकूण खूप मस्त वाटलं. दरम्यान, हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.