सर्वांसमोर 'ते' वाईट कृत्य करणं राखी सावंतला महागात

राखी सावंत बऱ्याचदा चर्चेत असते.

Updated: Aug 4, 2021, 10:32 PM IST
सर्वांसमोर 'ते' वाईट कृत्य करणं राखी सावंतला महागात

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतला लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणायचं हे चांगलच माहित आहे. राखी सावंत बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राखीला नेहमी इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं असतं. यासाठी ती खूप काही करते. 'बिग बॉस 14'नंतर राखी अजूनच चर्चेत आली आहे.

राखी चाहत्यांशी जोडलेली असते
आता शो संपल्यानंतरही, प्रेक्षक तिच्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. तसं, राखी अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. राखी सावंत तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 'बिग बॉस 14' नंतर तिचं फॅन फॉलोइंग खूप वाढलं आहे. ती कधीही तिच्या चाहत्यांना निराश करत नाही आणि दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांचं ती मनोरंजन करत असते.

राखी सावंत आणि विकास गुप्ता यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनातच माहिती आहे.
राखी सावंत आणि विकास गुप्ता यांच्या मैत्रीबद्दल सर्वांना माहिती आहे. दोघांची मैत्री 'बिग बॉस 14'च्या घरात झाली. दरम्यान, या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विकासने राखीसोबत काहीतरी केलं आहे. ज्यामुळे, या दोघांनाही आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. हा व्हिडिओ विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या कृत्यामुळे चाहत्यांनी विकासला ट्रोल केलं
व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, विकास गुप्ता राखी सावंतला आपल्या मांडीवर कॅमेरासमोर उचलतो. या व्हिडिओमध्ये दोघंही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. पण दोघांच्या चाहत्यांना विकासाची ही कल्पना आवडली नाही. विकासने राखीला उचलून हातात घेणं चाहत्यांना आवडलेलं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांनी व्हिडिओवर अश्लील कमेंट
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर आक्षेप व्यक्त करत चाहते विकास आणि राखीला खूप ट्रोल करत आहेत. एका युजर्सने लिहिलं, 'राज कुंद्राचा साथीदार.' तर दुस-याने लिहिलं की, 'हे किती घृणास्पद लोक आहेत'. दोघांनीही लग्न करावं असे सांगितलं. नेटकरी अश्या प्रकारच्या कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत या दोघांना ट्रोल करत आहेत.