तू भेट मग बघतो तुला, Akshay Kumar नेमकं Kapil Sharma ला असं का म्हणाला?

या- न त्या कारणानं आपण एकमेकांवर आदळूच या भावनेनं सहसा सेलिब्रिटी एकमेकांशी 'पंगा' घेत नाहीत

Updated: Aug 4, 2021, 09:25 PM IST
तू भेट मग बघतो तुला, Akshay Kumar नेमकं Kapil Sharma ला असं का म्हणाला?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमद्ये सहसा कलाकार मंडळी त्यांच्यामध्ये असणारं मैत्रीचं नातं टीकवण्याला प्राधान्य देतात. दुनिया गोल है... असं म्हणत या- न त्या कारणानं आपण एकमेकांवर आदळूच या भावनेनं सहसा सेलिब्रिटी एकमेकांशी 'पंगा' घेत नाहीत. पण, आता मात्र अभिनेता- विनोदवीर कपिल शर्मा आणि अक्षय कुमार यांच्यातील नात्याचं चित्र मात्र काहीसं बदललेलं आहे. 

कपिलनं केलेलं ट्विट आणि त्यावर खिलाडी कुमारनं दिलेलं उत्तर वाचून याचा अंदाज येत आहे. अर्थात, या दोन्ही कलाकारांमधील हे संभाषण पूर्णपणे विनोदी अंगाने असून, हा काही खराखुरा वाद नाही, हे लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं. 

Akshay Kumar येत्या काळात कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. खिलाडी कुमारच्या आगामी 'बेल बॉटम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कपिलने त्याला शुभेच्छा दिल्या. त्याच्य़ा शुभेच्छा पाहून अक्षयनेही विनोदी अंदाजातच त्यावर उत्तर दिलं. 

'कार्यक्रमात येतोय असं कळलं तशा लगेच शुभेच्छा दिल्या.... त्याआधी नाही, भेट तू; मी बघतो तुला', असं ट्विट अक्षय कुमारने दिलं. त्याचं हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनीही या दोन्ही कलाकारांमध्ये ट्विटरवरुन झालेल्या या संवादाची मजा घेत त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.