मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता विक्रम यांची तब्येत अचानक बिघडली आहे. वृत्तानुसार, विक्रमला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, विक्रमच्या ताजे हेल्थ अपडेट ऐकून चाहते खूप निराश झाले आहेत आणि त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
विक्रमची प्रकृती खालावली
विशेष म्हणजे साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार विक्रमच्या तब्येतीबाबत हे मोठं अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी विक्रमची तब्येत अचानक बिघडली. यानंतर विक्रमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विक्रमच्या छातीत दुखत होतं. मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली.
सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर विक्रमला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून सोशल मीडियावर लोकं विक्रमला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. विक्रमचं नाव साऊथ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असल्याची माहिती आहे.
विक्रमचा आगामी सिनेमा पोन्नियिन सेल्वन
विक्रमची तब्येत बिघडल्यानंतर त्याच्या पुढील चित्रपटांची चर्चा सर्वत्र रंगली आहे. साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन पार्ट वन पार्ट वनमध्ये विक्रम दिसणार असल्याची माहिती आहे. नुकताच पोनियिन सेल्वनमधून विक्रमचा लूक समोर आला होता. या चित्रपटात विक्रमसोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पोन्नियिन सेल्वन या वर्षी 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.