अभिनेत्री सोनालीचा मृत्यूआधीचा व्हिडीओ समोर..अशा अवस्थेत दिसली PA सुखविंदर सोबत..पोलिसांच्या हाती CCTV फुटेज

ज्यामध्ये सोनाली फोगट यांची अवस्था अतिशय वाईट दिसतेय त्यांना चालणंसुद्धा कठीण होतंय

Updated: Aug 26, 2022, 06:57 PM IST
अभिनेत्री सोनालीचा मृत्यूआधीचा व्हिडीओ समोर..अशा अवस्थेत दिसली PA सुखविंदर सोबत..पोलिसांच्या हाती CCTV फुटेज  title=

NEW CCTV FOOTAGE OF SONALI PHOGAT: काही दिवसांपूर्वीच टिकटॉक स्टार ,बिग बॉसची स्पर्धक अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. सोनाली यांचा  मृत्यू बरेच प्रश्न उपस्थित करुन गेला. सोनालीचा मृत्यू हा नॅचरल नसून यामागे काहीतरी दुसरं कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे तशी तक्रारसुद्धा गोवा पोलिसात दाखल करण्यात आली आहे. 

सोनाली फोगट यांच्या मृत्यूविषयी नवनवीन खुलासे समोर येत आहेत नुकतंच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.ज्यामध्ये सोनाली फोगट यांची अवस्था अतिशय वाईट दिसतेय त्यांना चालणंसुद्धा कठीण होतंय डाव्या पायाने त्या लंगडताना दिसत आहेत त्यांचा सहकारी त्यांना सावरतोय आणि बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत .गोवा पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास आणखी जोरदार केला आहे.

 

 ज्यादिवशी मुत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल  झाला आहे या व्हिडीओ मध्ये सोनाली फोगट त्यांचा PA Sudhir Sangwan आणि Sukhwinder Sangwan सोबत डान्स करताना दिसत आहे .हा व्हिडीओ मृत्यूच्या आधल्या दिवशीचा असल्याचा  सांगितलं जात आहे. 

पणजीचे पोलीस निरीक्षकांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही महत्वाची माहिती समोर आणली आहे. त्यांच्या माहितीनुसार जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात दोघेजण सोनालीला जबरदस्ती काहीतरी ड्रिंक पाजत होते. त्यांनतर दोघांनी तिला बाथरूम मध्ये नेलं आणि दोन तास ते बाथरूम मधेच होते दरम्यान बाथरूम मध्ये तिला काही इंज्युरी झाली असावी असं सांगण्यात येतंय तर सिंथेटिक ड्रग दिल्यामुळेच तिचा मृत्यू झालायचं तपासात समोर आलं आहे.

सोनाली यांचा भाऊ, रिंकू ढाकानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बहाण्यानं गोव्यात आणलं गेलं. पण, इथं कोणतंही चित्रीकरण होणार नव्हतं. कुटुंबाला हे चित्रीकरण 24 ऑगस्टला होणार होतं, पण हॉटेल मात्र 21-22 ऑगस्टसाठीच बुक करण्यात आल्याची माहिती असल्याचंही त्यानं दिली. (actress tunred bjp leader Sonali phogat death controversy details big news)