"मी कोण आहे माहिती आहे का?," हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखल्याने उर्फी जावेदचा राडा; म्हणाली "WTF!..."

Uorfi Javed Viral Video: उर्फी जावेदला (Uorfi Javed) मुंबईतील एका रेस्तराँमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. उर्फीने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तसंच व्हिडीओही व्हायरल (Viral Video) झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2023, 01:51 PM IST
"मी कोण आहे माहिती आहे का?," हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखल्याने उर्फी जावेदचा राडा; म्हणाली "WTF!..." title=

Uorfi Javed Viral Video: आपल्या चित्र-विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी चर्चेत असते. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे तिचे फोटो, व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. दरम्यान सध्या उर्फी जावेद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मुंबईतील एका रेस्तराँमध्ये उर्फीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. 25 एप्रिलला उर्फीला रिझर्व्हेशन केलं नसल्याने रोखण्यात आलं. मात्र यानंतर उर्फीने तेथील मॅनेजरशी वाद घातला. यानंतर उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. रिझर्व्हेशन नव्हे तर फॅशनमुळे रोखण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. 

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, उर्फीला रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. व्हिडीओत उर्फी कारमधून उतरुन रेस्तराँमध्ये जाताना दिसत आहे. मॅनेजर तिला रिझर्व्हेशन नसल्याचं सांगतो. यानंतर उर्फी मॅनेजेरशी वाद घालण्यास सुरुवात करते. उर्फीचा संयम सुटतो आणि ती मॅनेजरला सांगते की, 'माझं नाव माहिती आहे का, उर्फी जावेद....माझ्यासाठी जागा तयार होते. जाऊन बघ'. यानंतरही मॅनेजर तिला शांतपणे सीट नाही आहे सांगत समजावण्याचा प्रयत्न करतो. यानंतर उर्फी म्हणते की 'हे सीटचं नाटक नाही, तर कपड्यांचं नाटक आहे. माझ्या कपड्यांमुळे मला रोखलं जात आहे. मला सर्व समजत आहे'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही आपला संताप व्यक्त केला आहे. उर्फीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "WTF! ही खरंच 21 व्या शतकातील मुंबई आहे का? रेस्तराँमध्ये मला आज प्रवेश नाकारण्यात आला. माझ्या फॅशनशी तुम्ही असहमत असाल तर ठीक. मला त्यासाठी वेगळी वागणूक देण्याची गरज नाही, जर देत असाल तर मग मान्य करा. मला उगाच क्षुल्लक कारणं देऊ नका. कृपया यामध्ये लक्ष घाला @zomato #mumbai". 

बिग बॉस ओटीटीमुळे उर्फी जावेदला प्रसिद्धी मिळाली. त्याआधी, Uorfi ने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. 'बडे भैय्या की दुल्हनिया'मध्ये अवनीची भूमिका तिने साकारली होती. मेरी दुर्गा, बेपन्नाह आणि अल्ट बालाजी वर प्रसारित झालेल्या पंच बीट सीझन 2 मध्ये ती दिसली होती. 

2016 ते 2017 पर्यंत, उर्फीने स्टार प्लसच्या 'चंद्र नंदिनी'मध्ये छायाची भूमिका साकारली होती. 2018 मध्ये, अभिनेत्रीने सब टीव्हीच्या 'सात फेरो की हेरा फेरी'मध्ये कामिनी जोशीची भूमिका निभावली होती. 2020 मध्ये, उर्फीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये शिवानी भाटियाच्या भूमिकेत दिसली होती आणि नंतर 'कसौटी जिंदगी की'मध्ये तनिषा चक्रवर्तीची भूमिका निभावली होती.