हल्लीच विवाहबंधनात अडकलेल्या बी- टाऊन अभिनेत्रीची आलिशान कार पाहाच

कारची किंमतही तशीच.... 

Updated: Oct 21, 2019, 05:29 PM IST
हल्लीच विवाहबंधनात अडकलेल्या बी- टाऊन अभिनेत्रीची आलिशान कार पाहाच
हल्लीच विवाहबंधनात अडकलेल्या बी- टाऊन अभिनेत्रीची आलिशान कार पाहाच

मुंबई :  सेलिब्रिटींची एकंदर जीवनशैली आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा व्यास पाहता त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कायमच सर्वांना कुतूहल लागलेलं असतं. आपली आवडती अभिनेत्री किंवा अभिनेच्याची जीवनशैली कशी आहे, ते कसे राहतात, त्यांचं घर कसं आहे, ते कोणती कार वापरतात असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत असतात. आता कारचा विषय निघालाच आहे, तर सध्याच्या घडीला एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या नव्या कारसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ही कार खरेदी केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. 

ती अभिनेत्री आहे, पूजा बत्रा. 'विरासत' फेम पूजा बत्रा हिने 'लव्ह माय कार', असं लिहित या कारसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. तिची ही कार जास्तच खास आहे कारण, ही कार आहे, 'टेस्ला मॉडेल ३ इलेक्ट्रिक सेदान'. 

 
 
 
 

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

मुख्य म्हणजे या कारची विक्री भारतात केली जात नाही. आता या कारची इथे विक्रीच केली जात नाही, तर मग पूजाला ही कार मिळाली तरी कशी? पडला ना प्रश्न? पूजाने शेअर केलेल्या याच फोटोमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. असं म्हटलं जात आहे की तिने ही कार कॅलिफोर्लनियामध्ये खरेदी केली आहे. 

दरम्यान, टेस्लाची ही खास आणि तितकीच आलिशान कार, टेस्ला मॉडेल ३ लवकरच भारतातगी लाँच केली जाणार आहे. या कारचे दर ७५ ला रुपयांपासून सुरु होणार आहेत. येत्या काळात भारतीय बाजारपेठांमध्ये आल्यानंतर ही कार, 'बीएमडब्ल्यू ३', 'मर्सिडीज बेंझ सी क्लास' आणि 'जग्वार एक्सई'ला तगडं आव्हान देणार आहे. अशी ही कार भारतात येण्यास नेमका किती कालावधी लागेल याचा अंदाज नाही. पण, तूर्तास पूजामात्र या कारच्या येण्याने प्रचंड आनंदात आहे, तेव्हा तिच्या आनंदातच अनेक चाहतेही सहभागी झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही.