Anushka Sharma And Virat Kohli Viral Video: अनुष्का आणि विराट कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी विराटच्या खेळीमुळे तर कधी इतर कारणाने अनेकदा अनुष्काला नेटकरी ट्रोल करतात. विराट आणि अनुष्का आपल्या दोन मुलांसह सध्या लंडनमध्ये राहत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका किर्तनातला हा व्हिडीओ असून दोघेही भक्तीत तल्लीन झाले आहेत.
लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका किर्तनात विराट आणि अनुष्काने हजेरी लावली होती. या व्हि़डीओत अनुष्का 'जय श्री राम' असा जप करताना दिसत आहे, तर विराट किर्तनात तल्लीन होऊन गेल्याचं दिसत आहे. किर्तनाला उपस्थिती लावलेल्या अनुष्काने निळ्या रंगाचा सिंपल टॉप परिधान केला आहे. आजुबाजूला असलेल्या लोकांमध्ये मिसळून हे दोघेही देवाचं नामस्मरण करण्यात हरवून गेलेत. नामवंत किर्तनकार कृष्णदास यांनी लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी या किर्तनाचं आयोजन केलं होतं. भजन आणि किर्तन हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देवापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली साधना म्हणजे 'भजन' आणि 'किर्तन'. म्हणूनच सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रटींपर्यंत अनेकजण भक्तीमार्गाने आयुष्य जगतात. दिलखुलास आणि बिनधास्त वागणं बोलणं असणारी अनुष्का या किर्तानात जप करताना खूपच निरागस दिसत होती. दोघांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. त्याचबरोबर चाहत्यांनी या दोघांचं ही खूप कौतुक केलं आहे.
Bhagwan naam mein magan apne king virat kohli.. the reason for his new found maturity and focus.. pic.twitter.com/TAO07sAus8
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) July 15, 2024
1960 पासून कृष्णदास यांनी आपल्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. नीम करोली बाबा यांचे ते शिष्य आहेत. यांचे देशभरात असंख्य भक्त आहेत. विराट कोहली देखील या बाबांचा भक्त आहे. त्यामुळे अनुष्का आणि विराट या किर्तनाला उपस्थित राहिले होते. कृष्णदास यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य भक्ती मार्गावर वाहिलं असून त्यांच्या किर्तानाचा लाभ घेण्यासाठी भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहतात. टी-20 विश्वचषकात भारताने विजेतेपद मिळवलं खरं पण विराटने कसलीही कल्पना न देता, निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे विराटच्या चाहत्यांनी यावर नाराजी देखील व्यक्त केली. सध्या विराट त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये छान वेळ घालवत आहे. अनुष्का आणि विराट आता कायमचेच लंडनला राहणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(28.5 ov) 99/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.