Anushka Sharma Virat Kohli Love Story : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली या जोडीकडे त्यांचे चाहते पॉवर कपल म्हणून पाहतात. दोघांना एकत्र पहायला चाहत्यांना खूप आवडतं. सोशल मीडियावर या कपलचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही सगळ्यात चर्चेत असणार हे कपल आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अनुष्का आणि विराटची रंजक लव्हस्टोरी सांगणार आहे.
अनुष्का आणि विराज पहिल्यांदा भेटले ते एका अॅड शूट दरम्यान. याआधी या दोघांमध्ये काहीच मैत्री नव्हती. एवढंच नव्हेतर जेव्हा पहिल्यांदा विराट अनुष्काला भेटला होता तेव्हा तो खूप घाबरला होता. यानंतर वातावरण हलकं-फुलकं करण्यालाठी त्याने जोक्सही मारले पण अनुष्का त्याच्या या वागणूकीवर चिडली तिला त्याची ही मस्ती बिलकूल आवडली नव्हती. मात्र कालांतराने दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.
यानंतर त्यांच्यातली मैत्री वाढत गेली. यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सतत भेचू लागले. त्यांच्यातलं बॉन्डिंग स्ट्रॉन्ग होत गेलं. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनेही जोर धरला. विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो वनडे सामन्यादरम्यान अनुष्काकडे बॅट दाखवून किस करताना दिसत होता. आणि खरंतर याच फोटोनंतर त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या.
रिपोर्टसवर विश्वास ठेवायचा झाला तर अनुष्का विराट कोहलीमध्ये सगळं सुरळित सुरु असताना दोघंही एकमेकांवर खूप सिरिअसदेखील होते. मात्र या दोघांमध्ये असं काही झालं ज्याने त्यांच नातं ब्रेकअपर्यंत पोहचलं. यानंतर हे कपल एकमेकांसोबत खूप कमीवेळी दिसूव लागले. इतपर्यंत की, दोघांनी सोशल मीडियावरुन एक-मेकांना अनफॉलो केलं होतं. मात्र नंतर या दोघांनी त्यांच्यातला वाद मिटवला आणि हे दोघं पुन्हा एकत्र आले.
दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तरिही 2017 मध्ये दोघंही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येऊ लागल्या. यानंतर, 2017 च्या शेवटी, 11 डिसेंबर रोजी, हे कपल इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले. नंतर दोघांनीही लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपलं नातं अधिकृत केले. सध्या या गोड कपलला वामिका नावाची गोंडस मुलगी आहे.